आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खळबळजनक!:अल्पवयीन प्रेमीयुगुलाची रेल्वेखाली आत्महत्या; तीन दिवसांपूर्वी केले होते पलायन!

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रेमप्रकरणातून एका अल्पवयीन प्रेमीयुगुलाने रेल्वे रुळावर रेल्वेखाली आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नागपूरच्या कामठी या परिसरात घडली आहे. या घटनेमुळे कामठीसह आजूबाजूच्या परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सदरील घटनेतील मृत अल्पवयीन मुलीच्या वडिलांचे काही दिवसांपूर्वीच मृत्यू झाले असून, तिची आई दुसऱ्याच्या येथे मोलमजुरीचे काम करते. तिला एक लहान भाऊ आणि बहिण आहे. तिचे प्रेमसंबंध होते. गेल्या आठवड्यात ती फोनवर प्रियकरासोबत बोलत असताना तिच्या आईने धरले होते. त्यामुळे आई तिच्यावर रागावली होती. तिच्या प्रेमसंबंधाला आईने विरोध केला होता.

दररोज प्रमाणे 8 मार्च रोजी आई कामावर गेली असता, तिने आपल्या प्रियकरासोबत दुपारच्या भरी पळ काढला होता. दिवसभर मुलगी घरी न आल्याने आईने शोधाशोध केली. मात्र ती कुठेच सापडली नाही. नंतर वस्तीतच असलेला तिचा प्रियकर देखील फरार असल्याचे समजले. त्यानंतर मुलीच्या आईने त्या मुलाच्या आईची भेट घेतली. अन् दोघांचे लग्न लावून देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, दोन दिवस झाले तरी दोघेही घरी न आल्याने शेवटी 10 मार्च रोजी मुलीच्या आईने नवीन कामठी पोलिस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ मुलाविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला.

पोलिस मारहाण करतील म्हणून, उचलले हे पाऊल
गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी प्रेमीयुगुलाची शोधाशोध सुरू केली. तेव्हा मुलांच्या मोबाईलचे लोकेशन कामठी परिसरात असल्याचे समजले. पोलिसांनी सांगितले की, आपल्यावर गुन्हा दाखल झाल्याची माहिती मुलीच्या प्रियकराला मिळाली होती. त्यानंतर पोलिस आपल्याला अटक करतील, मारहाण करतील. असे विचार मनात आल्यानंतर दोघांनी आत्महत्येचा निर्णय घेतला. त्यानंतर शुक्रवारच्या रात्री नऊ वाजेच्या सुमारास दोघेही कन्हानकडून कामठीकडे येणाऱ्या रेल्वे मार्गावर आले.

रेल्वेचालकाने वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र...
रेल्वेरुळावर आल्यानंतर अहमदाबाद एक्सप्रेस ही कामठीच्या दिशेने येत होती. गाडी जवळ येताच दोघेही रेल्वे रूळावर झोपले. चालकाच्या निदर्शनास हा प्रकार येताच चालकाने वारंवार हॉर्न वाजवले. तसेच गाडीही थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु, गाडी वेगात असल्याने दोघेही रेल्वेखाली चिरडल्या गेले. रेल्वे चालकाने स्वत: ही माहिती कामठी रेल्वे पोलिसांना दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...