आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nagpur
  • Summarizing The Governor's Statement, BJP's Tiredness, Koshyaris Have Respect For Chhatrapati Shivaji Maharaj Since Coming To The State Bawankule

भाजपकडून राज्यपालांच्या वक्तव्यावर सारवासारव:कोश्यारींना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आदर - चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर स्पष्टीकरण देताना भाजप नेत्यांची चांगलीच दमछाक होत आहे. राज्यपालांच्या वक्तव्यावरील राज्यात संताप थांबलेला नाही. मंगळवारी नागपुरात बोलताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यपालांची बाजू सावरताना बरीच कसरत करावी लागली.

राज्यपाल महाराष्ट्रात आले त्या दिवसापासून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आदर व्यक्त करीत आहे. शिवनेरी किल्ल्यावरही ते गेले. महाराजांबद्दलचे विषय संवेदनशीलतेने हाताळले. छत्रपतींचा कृतीशील आदर्श त्यांच्या वागण्या बोलण्यातून दिसतो. शिवरायाच्या इतिहासाला टाचणी लागेल असे त्यांनी काहीही केले नाही. भाजपचा कार्यकर्ता छत्रपती शिवरायांची उर्जा घेऊन आणि त्यांच्या इतिहासातून प्रेरणा घेऊन काम करतो, अशी सारवासारव बावनकुळे यांनी केली.

अंडरवर्ल्ड डाॅन दाऊद इब्राहिम याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्त्येचा कट रचल्याचा व्हाॅटस अ‍ॅप मेसेज मुंबई पोलिसांना आला आहे. राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस नक्कीच त्याचा शाेध घेतील आणि साेक्षमोक्ष लावतील, असे बावनकुळे यांनी सांगितले.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवरायांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी करीत राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचे धोतर फेडणाऱ्यावर 1 लाखांचे बक्षीस ठेवले आहे. त्यामुळे राज्यपालाच्या वक्तव्यानंतर हा वाद आता चांगला चिघळताना दिसत आहे.

आम्ही शाळेत शिकत होतो. तेव्हा आम्हाला आमचे शिक्षक विचारायचे तुमचा आवडता नेता कोण? तेव्हा ज्यांना सुभाषचंद्र बोस आवडायचे, ज्यांना गांधीजी आवडायचे आणि नेहरू आवडायचे ते त्यांची नावे घ्यायची. मला आता असे वाटते तुम्हाला कोणी विचारले तुमचा आयकॉन कोण? तुमचा आवडता नेता कोण? तर तुम्हाला महाराष्ट्राबाहेर जायची गरज नाही. महाराष्ट्रातच तुम्हाला अनेक आयकॉन आढळतील. शिवाजी महाराज तर जुन्या युगातील आहेत. मी आधुनिक युगाबाबत बोलत आहे. डॉ. आंबेडकरांपासून ते डॉ. नितीन गडकरींपर्यंत तुम्हाला सर्व इथेच मिळून जातील, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटले आहे. भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या विधानावरून महाराष्ट्र राज्यभर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

यापूर्वीही महाराष्ट्रातून गुजराती आणि राजस्थानी लोक बाहेर गेले, तर मुंबई ठाण्यात आणि आजूबाजूच्या भागात काहीच पैसा उरणार नाही, असे वक्तव्य कोश्यारी यांनी केले होते. त्या नंतर उठलेल्या वादळानंतर त्यांनी माफी मागितली होती.

बातम्या आणखी आहेत...