आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यमंत्री नसताना बंगल्यांची रंगरंगोटी कशी?:सुनील प्रभू यांच्या हरकतीच्या मुद्द्यावरून सभागृहात पिकली खसखस

नागपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य मंत्रिमंडळात एकही राज्यमंत्री नसताना बंगल्यांची रंगरंगोटी कशी, असा हरकतीचा मुद्दा विधानसभा सदस्य सुनील प्रभू यांनी उपस्थित केला. त्यावरून सभागृहात खसखस पिकली.

उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रभू यांना उत्तर दिले. ते म्हणाले, बांधकाम विभागाला हे माहिती नसते सरकार कधी मंत्रिमंडळ विस्तार करणार आहे. सरकार कधीही मंत्रिमंडळ विस्तार करू शकते, अधिवेशनातही विस्तार होऊ शकते असे म्हणताच सभागृहात हास्याची लकेर उमटली.

बेळगाववर मांडावा ठराव

मुख्यमंत्र्यांनी बेळगाववर ठराव मांडावा व सभागृहाने तो एकमताने पारित करावा, अशी सूचना छगन भुजबळ यांनी केली. ​​​​​ तर रामटेक येथील कालिदास संस्कृत विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ आहे. मात्र, माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यास राज्यपालांनी नकार दिल्याची खंत, अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली. त्यावर अध्यक्षांनी राज्यपालांच्या कृतीवरती सभागृहात चर्चा करत नाही, असे रूलिंग दिले. सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत राज्यपालांच्या हेतूबद्दल शंका व्यक्त घेता येत नाही. अमृतमहोत्सवी वर्षात चुकीचे काही सांगू नये असे सांगित वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

आत्रामांना नक्षल्यांची धमकी

धर्मरावबाबा आत्राम यांना थेट नक्षली धमकी आल्याची माहिती विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली. सूरजागड लोहखनीज प्रकल्पामुळे प्रशासनात तणाव निर्माण झाला आहे. नक्षल्यांची धमकी लक्षात घेता आत्राम यांची सुरक्षा वाढवावी, प्रशासनाची काळजी घ्यावी, अशी मागणी करण्यात आली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धमकीची गंभीर दखल शासनाने घेतली असून त्यांना आवश्यक सुरक्षा दिली जाईल असे सांगितले. दिलीप वळसे - पाटील यांनी सूरजागड प्रकल्प बंद पाडण्यासाठी नक्षल्यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. तिथे बेरोजगारांना मिळालेला रोजगार हिरावल्या जाणार नाही याबद्दल आश्वस्त करावे, अशी मागणी केली.

सूरजागडवर साधकबाधक चर्चा

उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी जूनपर्यत सुरजागडचा पहिला टप्पा सुरू होणार असून अजून २० हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे. सुरूवातीला असलेला लोकांचा विरोधही आता मावळत चालला आहे. यातील सर्व अडथळे दूर करण्याचे प्रयत्न आहे.

नक्षल्यांना घाबरणार नाही

काँग्रेसचे नाना पटोले यांनी वस्तुस्थिती वेगळी असल्याचे सांगितले. रस्त्यांमुळे अनेकांचे जीव गेले, झाडे तोडली गेली. सूरजागड प्रकल्पामुळे नक्षल्यांना ताकद मिळत आहे. या प्रकरणाला सहजतेने घेऊ नका. यावर उच्चस्तरीय बैठक लावावी, अशी मागणी पटोले यांनी केली. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी नक्षलवाद्यांना घाबरून महाराष्ट्र थांबणार नाही, असे सांगितले. नक्षलवाद्यांमध्ये गडचिराेलीचे तरुण नाहीत. त्यांना छत्तीसगढमधून भरती करावी लागत आहे. स्थानिकांना रोजगार मिळत असल्याचे ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...