आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लक्षवेधीवरील चर्चेत कामगार मंत्र्यांची ग्वाही:कातकरी समाजातील वेठबीगारीसह पुनर्वसनाचे प्रश्न तातडीने सोडवू

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कातकरी समाजातील वेठबीगारीसह पुनर्वसनाचे प्रश्न तातडीने एक सयुक्त बैठक बोलावून तातडीने सोडवू अशी ग्वाही कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी लक्षवेधीवरील चर्चेत दिली. छगन भजबळ, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, धनंजय मुंडे आदींनी या लक्षवेधीद्वारे कातकमी समाजाच्या समस्यांकडे लक्ष वेधले होते.

नाशिक जिल्ह्यासह अहमदनगर, ठाणे, पालघर, रायगड आदी आदीवासी जिल्ह्यांत परिस्थिती गंभीर आहे. एका शेळी मेंढींच्या बदल्यात मुले विकली जात असल्याचे छगन भुजबळ यांनी लक्षात आणून दिले. या कातकरी समाजाचे पुनर्वसन, त्यांना आधारकार्ड, जात प्रमाणपत्र, घरकुल, शिधापत्रीका आदी सुविधा देणार काय, असा सवाल भुजबळ यांनी केला.

या लक्षवेधीवर उत्तर देताना कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी या प्रश्नावर संयुक्त बैठक बोलावून तातडीने सर्व समस्या सोडवण्यात येईल असे सांगितले. नाशिक, ठाणे व पालघर जिल्ह्यातील 24 बालके अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील मेंढपाळांकडे वेठबीगार म्हणून आढळली. यापैकी 16 बालकांना दहागाव येथील आदिम जाती माध्यमिक आश्रमशाळेत दाखल केले आहे. तीन बालकांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले आहे. तर 21 बालकांना वेठबीगारीतून सोडवण्यात आले आहे. ठाणे जिल्ह्यातील दोघांनी शाळेत जाण्यास नकार दिला आहे. पालघर जिल्ह्यातील दोन मुलींनाही आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळेत ठेवले आहे.

कातकमी समाजाचे पुनर्वसन तसेच त्यांना पुनर्वसन, त्यांना आधारकार्ड, जात प्रमाणपत्र, घरकुल, शिधापत्रीका आदी सुविधा देण्या संदर्भात बैठक बोलावून तातडीने मदत करण्यात येईल असे खाडे यांनी सांगितले. नाशिक व अहमदनगर जिल्ह्यात आढळून आलेल्या व वेठबीगारीतून सोडवण्यात आलेल्या 21 पैकी 19 मुलांना प्रत्येकी 30 हजारांची तातडीची मदत देण्यात आली आहे. या शिवाय केंद्राच्या वेठबीगार कायद्यानुसार प्रत्येक जिल्ह्यासाठी 10 लाखांची तरतुद करता येते. त्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल असे कामगारमंत्र्यांनी जाहीर केले.

बातम्या आणखी आहेत...