आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादिल्लीतील निर्भया कांडापेक्षाही मोठा किळसवाणा प्रकार भंडारा जिल्ह्यात घडला. यात पीडितेवर पाशवी सामूहिक अत्याचार करून तिच्या गुप्तांगाला गंभीर इजा पोहोचवली. यामुळे पीडिता गंभीर असून तिच्यावर नागपूर येथे एक शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. आणखी काही शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, या गंभीर प्रकरणाचा तपास स्थानिक पोलिसांकडून काढून तो एसआयटीकडे सोपवण्यात आला असून आयपीएस दर्जाची महिला पोलिस अधिकारी पुढील तपास करणार आहे. महिला आयोगानेही याची दखल घेतली असून जिल्हा पोलिस अधीक्षकांचा जबाब नोंदवणार आहे.
‘गोंदियातील महिलेवर भंडाऱ्यात सामूहिक अत्याचार’ या मथळ्याखाली सर्वप्रथम ‘दिव्य मराठी’ने वृत्त प्रकाशित केले. त्यानंतर प्रशासनात चांगलीच खळबळ उडाली. दरम्यान, या प्रकरणात कारधा पोलिसांनी दोघांना अटक केली. अत्याचारानंतर पीडितेच्या गुप्तांगात आणि पार्श्वभागात काही तरी घृणास्पदरीत्या टाकल्याने गंभीर इजा झाली. भंडाऱ्यात शस्त्रक्रिया करण्याची सुविधा नसल्याने पीडितेला तत्काळ नागपूरला हलवले. तिथे तिच्यावर एक शस्त्रक्रिया करण्यात आली असून आणखी काही शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. दिल्लीत निर्भया कांडापेक्षाही अत्यंत भयावह कृत्य भंडारा जिल्ह्यात घडले. दरम्यान, ३० आणि ३१ जुलैला सदर पीडितेवर गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यात सलग दोन दिवस जबरी अत्याचार करण्यात आल्याची गंभीर बाब चौकशीत समोर आली. सात दिवस लोटूनही गोंदिया पोलिसांना आरोपी सापडले नसल्याने पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
प्रकरणाचा तपास एसआयटीकडे सामूहिक अत्याचारप्रकरणी भंडारा पोलिसांनी दोघांना अटक केली. मात्र, प्रकरणाबाबत भंडारा पोलिसांनी मोठी गुप्तता बाळगली होती. घटना उघडकीस आल्याच्या तब्बल १५ तासांनंतर गुन्ह्याची नोंद करण्यात आली. यात तत्कालीन प्रभारी जिल्हा पोलिस अधीक्षक तथा अपर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती यांनी मोठी हयगय केल्याचा आरोप पीडितेच्या नातलग आणि समाजबांधवांनी केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे सोपवला असून यासाठी नांदेड येथून आयपीएस महिला अधिकारी भंडाऱ्यात येत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.