आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभाजप नेते तथा मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी धडा शिकवण्याची भाषा केली मला असं वाटते की शिंदे साहेबांसोबत जाऊन त्यांनी आता मोठा धडा शिकलेला आहे. त्यामुळे तो धडा घेतल्यानंतर त्यांना वाटत असेल की आपण आगीतून उठून फुफाट्यात पडलो आहे, असे मत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी व्यक्त केले आहे.
सुषमा अंधारे म्हणाल्या की, काहीतरी टीका करायची कर्नाटकच्या निवडणुकानंतर काहीतरी धास्ती घेतलेली आहे. त्यात शिंदे साहेबांसोबत गेल्यानंतर जी नकारात्मकता वाढत आहे, असल्याचे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे. तर काही करून ‘जो बूंद से गयी वो हौद से नही आती’ ते सुधीर भाऊंच्या लक्षात येत नसावं त्यामुळे ते अशा प्रकारचा स्टेटमेंट देतात, असे म्हणत खोचक टोलाही अंधारे यांनी लगावला आहे. ठाकरे गटाच्या शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे या काल नागपूरच्या दौऱ्यावर आल्या, रामटेकचा एका सभांमध्ये सुषमा अंधारे यांनी बीजेपीवर चांगले ताशेरे ओढले होते. कर्नाटकाच्या निवडणुकीमध्ये भाजपला कसा पराभूत झाला यावर सुषमा अंधारे यांनी टीकास्त्र टाकले होते.
चंद्रपूर जिल्हातील वनमंत्री सुधीर मुगंटीवार यांनी उद्धव ठाकरेंवर प्रतिक्रिया दिली होती. उद्धव ठाकरे यांना धडा शिकवण्यासाठी पहाटेचा शपथ विधी करण्यात आले होते. यावर नागपूरात पत्रकारांशी बोलताना सुधीर मुनगंटीवार यांच्यावर प्रत्युत्तर देत सुषमा अंधारे आणि तीक्ताच्या आधारावर फोडाफोडीच समर्थन करणारे स्टेटमेंट आहे.
सुषमा अंधारे म्हणाले की, भाजप बदलची जी नकारात्मकता आहे, ती वेगवेगळा निवडणुकामध्ये दिसून येत आहे. विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीने झेंडा रोवला बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये सुद्धा भाजपचा बाजार उठला हा सगळ्यांनी बघितला आता कर्नाटकच्या निवडणुकांमध्ये चक्क काँग्रेसच्या 136 पोहोचली. यामुळे भाजपमध्ये नकारात्मकता वाढली आहे.
सुषमा अंधारे म्हणाले की, त्यामूळे भाजपाचे नकारात्मकता भाजपच्या देशमुलाक राजकारणाची भाजपचे जे अत्यंत फोडाफोडीच राजकारण आहे. त्या फोडाफोडीच्या राजकारणामुळे वाढत आहे. पण आमची फोडाफोडी कशी नैतिक होती. हे पटवून देण्यासाठी जे सारवा सर्व धडपड चाललेली आहे सुधीर भाऊंचा स्टेटमेंट हे आपल्या अनैतिक फोडाफोडीच समर्थन करण्यासाठी स्टेटमेंट आहे. यामुळे आम्हाला वाटते अशाने, बुंद से गई सो होस नहीं आती है, असे सुषमा अंधारेंनी म्हटले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.