आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबनावट नोटा चलनात आणणाऱ्या वर्धेतील तिघांना अटक करण्यात आल्यानंतर या नोटांचे केंद्र असलेल्या इंदूर येथून प्रिंटरवर नोटा तयार करणाऱ्या मुख्य सूत्रधारास ताब्यात घेत २ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आतापर्यंत या बनावट नोटा प्रकरणात सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे.
शहरातील गोपुरी परिसरात पंधरा दिवसांपूर्वी बनावट नोटा चलनात आणत असल्याची माहिती पोलिस अधीक्षकांच्या गुप्तचर पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत पाच जणांना अटक केली होती. आता पोलिसांनी ओमप्रकाश भगवान लालवानी (रा. इंदूर) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडूनही ५०० रुपयांच्या ११ नोटा जप्त करण्यात आल्या. आरोपीला गुरुवारपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. या वेळी प्रिंटर, मोबाईल व लॅपटॉप तसेच ५०० रुपयांच्या ४२८ बनावट नोटा जप्त करण्यात आल्या.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.