आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वाइन फ्लू’चा संसर्ग:नागपुरात ‘स्वाइन फ्लू’ने आतापर्यंत घेतले तीन बळी

नागपूर8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूरमध्ये ‘स्वाइन फ्लू’चा संसर्ग वाढत असून सध्या शहरातील विविध रुग्णालयांत या आजाराचे ४६ रुग्ण दाखल आहेत. आतापर्यंत ३ रुग्णांचा मृत्यू झाला असून दोघे व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती महापालिकेने दिली. स्वाइन फ्लू मृत्यू विश्लेषण बैठकीत नागपूर महापालिकेने एकूण ३ मृत्यूंचा अहवाल मांडला. त्यापैकी दोन मृत्यू नागपूर शहरात झाले, तर एक रुग्ण जिल्ह्याबाहेरील होता. नागपूरच्या विविध रुग्णालयांत शुक्रवारपर्यंत ‘स्वाइन फ्लू’चे ७५ रुग्ण नोंदवले गेले. सर्वाधिक ४५ रुग्ण नागपूरच्या शहरी भागातील आहेत, तर २४ रुग्ण ग्रामीणसह जिल्ह्याबाहेरील आहेत. एकूण रुग्णांपैकी १९ जण बरे होऊन घरी परतले, तर ४६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यातील २ अत्यवस्थ रुग्ण जीवरक्षक प्रणालीवर आहेत, तर ६ रुग्ण गृह विलगीकरणात उपचार घेत आहेत.

बातम्या आणखी आहेत...