आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाघीणींवर नजर:भानुसखिंडीतील जखमी वाघीण व चार बछड्यांवर 25 वनकर्मचारी, 16 कॅमेरा ट्रॅपमधून ठेवणार लक्ष

नागपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात जखमी वाघीणींवर 25 वनकर्मचारी, 16 कॅमेरा ट्रॅपमधून नजर ठेवली जात आहे. ही वाघीण चार बछड्यांसह तंदुरुस्त असल्याचे सांगण्यात येत आहे. खडसंगी वनपरिक्षेत्र (बफर झोन) परिसरातील भानूसखिंडी येथील ही वाघीण असल्याचे समजतेय.

वाघीण तंदुरूस्त

निमढेला, अलिझंझा, नवेगाव गेटमधून येणाऱ्या पर्यटकांचे आकर्षण असणारी तसेच फेब्रुवारी महिन्यात सचिन तेंडुलकरची आवडती ठरलेली ही वाघीण लंगडत असल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्याने पर्यटकांमध्ये चिंता व्यक्त केली जात होती. नंतर वनविभागाने वाघीण तंदुरूस्त असल्याचे जाहीर केले.

या वाघिणीचा व तिच्या चार बछड्यांना वावर भानूसखिंडी निमढेला गेट परिसरात आहे. वाघीण चार बछड्यांसोबत या परिसरात फिरत आहे. ती बछड्यांना शिकारीचे प्रशिक्षण देत आहे. निमढेला परिसरात चार बछड्यांसह लंगडत चालत असल्याचा व्हिडीओ पर्यटकांनी समाज माध्यमावर व्हायरल केला होता.

वाघीणीवर उपचाराची मागणी

त्यानंतर या वाघिणीवर वेळीच उपचार करावा, अशी मागणी येथील वन्य जीव अभ्यासक सुरेश चोपणे तथा इतर वन्य जीव प्रेमींनी ताडोबाचे संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांच्याकडे वाघीण तथा बछड्यांवर लक्ष ठेवून उपचार करावे अशी मागणी केली होती.

वाघिणीच्या हालचालीवर नजर

ताडोबा व्यवस्थापनाने 25 कर्मचाऱ्यांच्या मदतीने 16 ट्रॅप कमेऱ्याने तिचा शोध घेतला. यावेळी ती तंदुरुस्त असल्याचे दिसून आले असून बछड्यांचीही तब्येत एकदम ठीक असल्याचे कॅमेऱ्यात दिसल्याची माहिती वनाधिकाऱ्यांनी दिली.

समाज माध्यमावरील पर्यटकांनी टाकलेला जखमी वाघीण व बछड्याचा व्हिडीओची दखल घेत 25 कर्मचाऱ्यांसह 16 ट्रॅप कॅमेऱ्यातून शोध मोहीम राबविण्यात आली. यामध्ये निमढेला परिसरात भानूसखिडी वाघीण व बछडे तंदुरुस्त आहे. वन विभाग त्या वाघिणीच्या हालचालीवर नजर ठेवून आहे.