आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ. नीलम गोऱ्हे म्‍हणाल्‍या:भंडारा अत्याचारप्रकरणी दोषींवर कारवाई करा

नागपूर3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भंडारा महिला अत्याचारप्रकरणी दोषींवर कडक करावी, असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले. उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी या घटनेची दखल घेऊन स्थानिक पोलिस प्रशासनाशी संपर्क साधला.तत्पूर्वी डॉ. गोऱ्हे यांनी पीडित महिलेच्या कुटुंबीयांना प्रकृतीची विचारपूस करून धीर दिला, त्यांना न्याय मिळण्याकरिता कायदेशीर मदत करणार असल्याची ग्वाहीदेखील दिली.

नागपूर वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून पीडित महिलेच्या प्रकृतीची विचारणा केली. तिच्या संपूर्ण उपचारासाठी शासकीय स्तरावर सर्व काळजी घेतली जाईल अशी ग्वाही दिली. या दरम्यान, भंडारा जिल्हा पोलिस अधीक्षक (का.) अनिकेत भारती यांनीही या घटनेचा अधिक गतीने तपास करून योग्य ती कार्यवाही करणार असल्याची माहिती दिली.

बातम्या आणखी आहेत...