आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपूरमध्ये चोरीच्या घटनात वाढ:गर्दीचा फायदा घेत रेल्वेस्थानकावर चोरी करणाऱ्या टोळीला केले जेरबंद

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गर्दीचा फायदा घेत रेल्वे प्रवाशांचे मोबाईल व पॉकेटमध्ये ठेवलेले पैसे चोरी करणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात नागपूर रेल्वे पोलिसांना मंगळवारी यश आले आहे. गोलु मेडका काळे, डिरी मेडका काळे, राहुल सुरज श्रीवास अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

प्राप्त माहितीनुसार, सोमवारी रेल्वेस्थानकावरील फलाट क्र. 2 मध्ये काही प्रवासी पाणी पिण्यासाठी गेले असता गर्दीचा फायदा घेऊन त्यांच्या पॉकेट मधील सामानासह 4 हजार व 950 रुपये चोरट्यांनी चोरी केले. याची तक्रार त्यांनी नागपूर रेल्वे पोलिस स्टेशन येथे केली. गुन्ह्याचे गांभीर्य पाहता लोहमार्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा टिमने फलाट क्र. 2 वर पाळत ठेवली. या दरम्यान सदर आरोपींची चौकशी केली असता त्यांच्याकडे रेल्वे प्रवाशाचा चोरी केलेला 12 हजार किमतीच्या मोबाईलसह अन्य साहित्य असा एकूण 16 हजार 850 रुपयाचा मुद्देमाल आढळून आला. तिन्ही आरोपींनी चोरी केल्याची कबूली दिली आहे. आरोपींना नागपूर रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अपर पोलीस अधीक्षक वैशाली शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी हेमंत शिंदे, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक विकास कानपिल्लेवार यांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक प्रवीण भिमटे, सहायक फौजदार सुरेश रावलवार, हवालदार नागदेव शहारे, रविंद्र सावजी, महेंद्र मानकर, रविकात इंगळे, पोलिस नायक विनोद खोब्रागडे, अवीन गजबे, नितीन शेंडे, शिपायी अमित त्रिवेदी, राहुल यावले. गिरीष राउत, रोशनअली सय्यद, चंद्रशेखर मदनकर यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...