आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अत्याचार:शिक्षकी पेशाला काळीमा; नागपूरमध्ये विद्यार्थीनीवर बलात्कार करणाऱ्या शिक्षकाला अटक

नागपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लग्नाचे आमिष दाखवून सहावीतील विद्यार्थीनीवर बलात्कार करणाऱ्या शिक्षकाला सक्करदरा पोलिसांनी अटक केली आहे. हा शिक्षक डिसेंबर 2022 पासून या विद्यार्थीनीचे लैंगिक शोषण करीत होता.

सहावीत शिकणाऱ्या 12 वर्षीय मुलीने पोट दुखत असल्याचा त्रास होत असल्याचे तिच्या आईला एक दोन वेळा सांगितले होते. 5 एप्रिल रोजी घरी आल्यावर तिने शाळेतील गणिताचे शिक्षक संजय विठ्ठल पांडे (वय 57) यांचे नाव सांगितले. पांडे पीडित मुलीला पेपर सुटल्या नंतर विज्ञान प्रयोग शाळेत नेऊन तिच्याशी शारीरिक संबंध ठेवत होते असे मुलीने आईला सांगितले. आईने मुलीला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता पांडे याने लग्न करणार असल्याचे सांगून वारंवार संबंध ठेवल्याचे सांगितले. या शिवाय ही गोष्ट कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याचीही धमकी दिली. मुलीच्या आईने सक्करदरा पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केल्यानंतर कलम 376 (एबी), 376 (२) (फ), 376 (२) (एन) तसेच पोक्सो कायद्या नुसार गुन्हा दाखल करून आरोपी शिक्षक संजय पांडे याला अटक केली आहे.

यापूर्वी 2021 मध्ये यवतमाळ येथे शिक्षक विद्यार्थ्याच्या नात्याला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली होती. 7 ऑगस्ट 2021 मध्ये यवतमाळमध्ये एका जिल्हा परिषद शिक्षकाला विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. शिक्षक 2 महिन्यांपासून बलात्कार करीत होता. आरोपी जिल्हा परिषद शिक्षक अरूण राठोड याला बेलोरा जिल्हा परिषद शाळेमध्ये गावातील मंडळींनी आक्षेपार्ह स्थितीमध्ये पाहिले होते. त्यानंतर त्यांनी त्याला फरफटत पोलिसांच्या स्वाधीन केले.