आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाळू तस्कराचा जीवघेणा हल्ला:तहसीलदारांचा हवेत गोळीबार, मोहाडीतील रोहा गावात टिप्पर अंगावर घातले

भंडाराएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वाळू तस्करांवर कारवाईसाठी गेलेल्या तहसीलदाराच्या अंगावर टिप्पर घालून जीव घेण्याचा प्रयत्न वाळू तस्कराने केला. यात तहसीलदार दीपक कारंडे यांनी त्यांच्याकडील रिव्हॉल्व्हरमधून स्वसंरक्षणार्थ हवेत गोळीबार केल्याची घटना बुधवारी रात्री मोहाडी तालुक्यातील रोहा गावात घडली. याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. रणजित ठवकर (२६, रा. रोहा) व विवेक चामट (२५, रा. कुशारी) असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.

बुधवारी तहसीलदार कारंडे यांना रोहा गावात तस्करांनी साठवलेली वाळू जेसीबीद्वारे टिप्परमध्ये भरून चोरी केली जात असल्याची माहिती मिळाली. कारंडे पथकासह रोहा गावात आले तेव्हा जेसीबीद्वारे टिप्परमध्ये वाळू भरली जात होती. तहसीलदारांनी याबाबत विचारणा करताच चालकाने जेसीबीच्या पंज्याद्वारे कारंडे यांच्यावर हल्ला चढवला. त्यामुळे तहसीलदारांनी स्वतःच्या संरक्षणार्थ त्यांच्याकडे असलेली रिव्हॉल्व्हरमधून दोनदा हवेत गोळीबार केला.

बातम्या आणखी आहेत...