आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा१९५० पासून २०५० पर्यंत वातावरणातील बदल आणि प्रदूषणाचा सर्वाधिक धोका असणाऱ्या जगातील २०० राज्यांत भारतातील १० राज्ये आहेत. बिहार सर्वाधिक जोखमीचे असून २०० राज्यांत महाराष्ट्र ३८ व्या स्थानी आहे. महाराष्ट्राला ८१% जोखीम असल्याची माहिती ग्राॅस डिपेन्डसी इनिशिएटिव्ह (एक्सडीआय) या क्लायमॅट रिस्क ग्रुपने केलेल्या विश्लेषण अहवालात नमूद आहे. ग्रॉस डोमेस्टिक क्लायमेट रिस्क डेटासेटने या राज्यांची तुलना प्रतिकूल हवामान व हवामान बदलाचे माॅडेल तयार करून केली. यात पूर, वनांतील आग, उष्णतेची लाट, समुद्र पातळी वाढीमुळे मालमत्तेचे होणारे नुकसान याचा अभ्यास करण्यात आला. जगातील प्रत्येक राज्य, प्रांत व प्रदेशांची तुलना करून भौतिक हवामान जोखीम विश्लेषणाची ही पहिलीच वेळ आहे, असे एक्सडीआयचे सीईओ रोहन हॅमडेन यांनी नमूद केले आहे.
जोखीम असलेल्या टाॅप-५० राज्यांपैकी ८० टक्के चीन, अमेरिका व भारतातील
टॉप ५० सर्वाधिक जोखमीची राज्ये व प्रांतांपैकी ८० टक्के चीन, अमेरिका आणि भारतातील आहेत. चीननंतर, टॉप ५०मध्ये भारतातील सर्वाधिक ९ राज्ये असून यात बिहार, उत्तर प्रदेश, आसाम, राजस्थान, तामिळनाडू, महाराष्ट्र, गुजरात, पंजाब आणि केरळचा समावेश आहे. अभ्यासात चीन व भारताचा विशेष उल्लेख आहे. २०५० पर्यंतच्या जोखीमीबाबत ज्या २०० प्रांतांचा अभ्यास करण्यात आला त्यातील अर्ध्याहून अधिक ११४ राज्ये आशिया खंडातील आहेत.
अहवाल काय सांगतो? : आशियातील ११४ राज्यांत बिहार २२ व्या स्थानावर ११४ आशियाई राज्यांत भारताचा समावेश असून बिहार, उत्तर प्रदेश, आसाम, राजस्थान, तामिळनाडू, महाराष्ट्र, गुजरात, केरळ, पंजाब व मध्य प्रदेेशचा या १० राज्यांत समावेश आहे. या निकषांआधारे गुंतवणूकदार मुंबई, न्यूयॉर्क व बर्लिनची थेट तुलना करू शकतात.
२०५० मध्ये सर्वाधिक जोखीम असलेल्या आशियातील ११४ राज्यांमध्ये बिहारचा २२ वा क्रमांक आहे. त्या खालोखाल उत्तर प्रदेश २५, आसाम २८, राजस्थान ३२, तामिळनाडू ३६, महाराष्ट्र ३८, गुजरात ४४, केरळ ५०, पंजाब ४८ आणि मध्य प्रदेेशचा ५२ वा क्रमांक आहे.
जगातील २६०० पेक्षा अधिक राज्यांचा अभ्यास
जगभरातील २,६०० पेक्षा जास्त प्रांतांच्या अभ्यासाचा हा डेटा असून यात दिल्लीचा ४४६ वा, झारखंड २१२९, मध्य प्रदेेश १३३८, हिमाचल ३९६, सिक्कीम ८२९, आंध्र प्रदेेश १५०५, छत्तीसगढ १४३२, त्रिपुरा १४०३, मणिपूर ७२७ व केरळचा ४८४ वा क्रमांक.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.