आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपुरात ट्रक - दुचाकीचा भीषण अपघात:दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू; वर्धा मार्गावरील सेजल बारसमोर घडली घटना

नागपूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपुरात भरधाव ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघाताची घटना उघडकीस आली. या अपघातात दुचाकीस्वारातचा जागीच मृत्यू झाला. सदरील ही घटना दुपारी घडली. संजय रामकृष्ण खापणे (वय-40) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्धा ते नागपूर दिशेने भरधाव जाणाऱ्या ट्रक चालकाने समोर असलेल्या स्विफ्ट डिझायर कारला (क्र. एम एच २९, एडी ३७५०) जोरदार धडक दिली. यामध्ये कार दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेने फेकल्या गेली. दरम्यान ट्रक चालकाचे ट्रकवरून नियंत्रण सुटल्यामुळे रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रॅक्टर क्र. एम.एच. ४०, ए ६४८४ ट्रक पुन्हा धडकला. मृत संजय रामकृष्ण खापणे दुचाकीने (एमएच ३१, एवाय ८६५८) बुटीबोरीला परत येत होता. ट्रकची ट्रॅक्टरला धडक बसल्यामुळे तो पुढच्या दिशेला फेकल्या गेला. त्यावेळी संजय खापणे याच्या दुचाकीला सुद्धा जबर धक्का लागल्याने तो दुचाकीवरून खाली कोसळला आणि त्याचवेळी ट्रॅक्टरच्या मागील चाकाखाली आल्याने त्याचा जागीच चिरडून मृत्यू झाला.

ट्रकने आधी धडक दिलेल्या कारमध्ये दोन छोट्या मुलांसह यवतमाळ येथील एक परिवार होता. सुदैवाने त्यांना कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नाही. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळ गाठले. त्यावेळी ट्रक चालक आपले वाहन सोडून पसार झाला होता. घटनेचा पंचनामा करून ट्रकचालका विरुद्ध गुन्हा दाखल केला. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदना करिता पाठवण्यात आला. ट्रक चालक हा मद्यधुंद अवस्थेत होता असे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले असून बातमी लिहितोवर आरोपी ट्रक चालकास अटक झालेली नव्हती.

बातम्या आणखी आहेत...