आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआदित्य ठाकरे यांच्या युवा सेनेला विदर्भात खिंडार पडले असून तेरा पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याची माहिती बाळासाहेबांची शिवसेना गटाचे विदर्भाचे प्रमुख किरण पांडव यांनी दिली. शिवसेनेचे 40 आमदार आणि अनेक जिल्हाप्रमुख आणि पदाधिकारी आपल्या बाजूने वळवल्यानंतर शिंदे सेनेने उद्धव ठाकरें पाठोपाठ विदर्भात आदित्य ठाकरेंना जबर धक्का दिल्याचे बोलले जात आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत तसेच डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यावर विश्वास दाखवत पूर्व विदर्भातील युवासेनेचे हे पदाधिकारी शिंदे गटामध्ये सहभागी झाल्याचे पांडव यांनी सांगितले. उद्धव ठाकरेंना आव्हान देत बंड केल्यानंतर शिंदे गटाकडून शिवसेना पक्षावरच दावा करण्यात आला. सध्या हे प्रकरण केंद्रीय निवडणूक आयोगात न्यायप्रविष्ट असताना आता शिंदे गटाने आदित्य ठाकरेंच्या युवा सेनेला खिंडार पाडण्याचे ठरवले आहे. पूर्व विर्दभातील युवा सेनेच्या सात जिल्हाप्रमुखांनी शिंदे गटात प्रवेश केलाय. 40 बंडखोर आमदारांविरोधात महाराष्ट्रभर फिरत असलेल्या आदित्य ठाकरेंना हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.
एकनाथ शिंदेंनी शिवसेने विरोधात बंड करीत भाजपसोबत सत्ता स्थापन केली आणि मुख्यमंत्रीही झाले. त्यानंतर शिंदेंनी थेट शिवसेनेवर हक्क सांगितला. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना आता शिंदे गटाने विदर्भात झटका दिला आहे. विदर्भातील युवा सेनेच्या हर्षल शिंदे (युवासेना जिल्हाप्रमुख, चंद्रपूर), शुभम नवले (युवासेना जिल्हाप्रमुख, नागपूर ग्रामीण), रोशन कळंबे (युवासेना जिल्हाप्रमुख, भंडारा), दीपक भारसाखरे (युवासेना जिल्हाप्रमुख, गडचिरोली), कगेश राव (युवासेना जिल्हाप्रमुख, गोंदिया), नेहा भोकरे (युवती सेना जिल्हाप्रमुख, नागपूर), सोनाली वैद्य (युवती सेना जिल्हाप्रमुख, नागपूर ग्रामीण) प्रफुल सरवान (जिल्हा समन्वयक आणि नगरसेवक भद्रावती, चंद्रपूर) राज तांडेकर (जिल्हा समन्वयक, नागपूर), लखन यादव (जिल्हा समन्वयक, रामटेक), कानाजी जोगराणा (जिल्हा चिटणीस, नागपूर), अभिषेक गिरी (उप-जिल्हा प्रमुख, नागपूर ग्रामीण), सुनील यादव (रामटेक विधानसभा समन्वयक) यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.