आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिंदे सेनेच्या खासदाराचा दावा:​​​​​​​ठाकरेंचे शिल्लक खासदार, आमदारही फुटणार : कृपाल तुमाने

नागपूर3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उद्धवसेनेतील शिल्लक खासदार, आमदारही फुटणार आहेत. त्यासाठी या खासदारांसोबत आमची मुंबईमध्ये गुप्त बैठक झाल्याचा दावा शिवसेना म्हणजे शिंदेसेनेचे रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांनी केला.

तुमाने म्हणाले की, काल मुंबईत उद्धवसेनेच्या त्या खासदारांसोबत आमची बैठक झाली. ते शिंदेसेनेत येण्यास तयार आहेत. लवकरच त्यांचा पक्षप्रवेश होईल. ज्यांच्यासोबत बैठक झाली. त्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना केली. आम्ही १३ खासदार ज्या मतदारसंघातून निवडून आलो. तेच मतदारसंघ आम्ही लढवू. उर्वरित जागांचा निर्णय शिंदे-फडणवीस घेतील.