आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्‍हणाले:‘ते विधान मुंबई मनपासाठी नव्हे तर संपूर्ण निवडणुकीसाठी’ त्यामुळे निवडणुकीत स्वत: झोकून देणार

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई महापालिका निवडणुकीसंबंधी बोलताना केलेले वक्तव्य हे केवळ मुंबई महापालिका निवडणुकीपुरते मर्यादित नव्हते, तर एकूणच निवडणूक लढवण्याच्या पद्धतीबद्दलचे होते, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

केवळ मुंबई महापालिकाच नव्हे तर कुठलीही निवडणूक आपल्या जीवनातील शेवटची निवडणूक आहे, असे समजून आपण झोकून दिल्याशिवाय निवडणूक जिंकता येत नाही. केवळ एकट्या मुंबई महापालिका निवडणुकीबद्दल हे वक्तव्य नव्हते, तर एकूणच निवडणूक लढवण्याच्या पद्धतीबद्दल हे वक्तव्य केले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिंदे गट मुंबई महापालिकेची निवडणूक एकत्र लढवणार आहे, अशी चर्चा आहे, यावर फडणवीस म्हणाले की, माध्यमांची पतंगबाजी पाहतो तेव्हा मलादेखील खूप मजा येते. ज्याला जे मनात येईल, ते दाखवतो. ज्याला जसे वाटते तसे अर्थ काढले जातात. तुम्ही बघत राहा भाजप व शिवसेना ओरिजिनल म्हणजे शिंदे गट एकत्र निवडणूक लढवून मुंबई महापालिकेवर भगवा फडकवू, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला.

म्हणून बारामतीवर लक्ष : देशाप्रमाणे राज्यातही भाजपचे मिशन महाराष्ट्र आहे. बारामती महाराष्ट्रात येते त्यामुळे मिशन महाराष्ट्रात बारामती आहे. बारामतीच लक्ष्य असे काही नाही. आमच्याकरिता प्रत्येक जागा महत्त्वाची आहे, असे फडणवीस म्हणाले. भाजप प्रदेशाध्यक्ष बारामतीत मुक्काम ठोकून आहेत, याकडे लक्ष वेधले असता फडणवीस यांनी बारामती महाराष्ट्रात येते म्हणून लक्ष देत असल्याचे सांगितले.

बातम्या आणखी आहेत...