आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर येथे 3 ते 7 जानेवारी 2023 या कालावधीत 108वी इंडियन सायन्स काँग्रेस आयोजित केली जाणार आहे. विद्यापीठाला हा बहुमान दुसऱ्यांदा मिळाला आहे. यापूर्वी 1974 मध्ये विद्यापीठाने आयोजन केले होते, अशी माहिती कुलगुरू डाॅ. सुभाष चौधरी यांनी दिली. या संमेलनात नामवंत भारतीय आणि आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञ आणि नोबेल पुरस्कार विजेते उपस्थित राहाणार आहे.
परंपरेनुसार, प्रत्येक भारतीय विज्ञान काँग्रेस उद्घाटनाच्या वेळी पंतप्रधानांचे भाषण असते. 1974 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी उद्घाटन सत्रासाठी नागपुरात आल्या होत्या. "शाश्वत विकास, महिला सक्षमीकरण आणि हे साध्य करण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाची भूमिका' ही सायंस काँग्रेसची थिम आहे. या विषयाची प्रासंगिकता डिजिटल इंडियाच्या जागतिक परिस्थितीमध्ये प्रकट झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते इंडियन सायंस काँग्रेसचे उद्घाटन होणार आहे. त्यांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. मात्र अजूनपर्यत त्यांच्या कार्यालयाकडून कन्फर्मेशन आलेले नाही.
दोन नोबेल विजेत्यांचे कन्फर्मेशन
या सायंस काँग्रेससाठी एकूण दहा नोबेल विजेत्या वैज्ञानिकांशी संपर्क साधण्यात आला. त्यापैकी पाच जणांनी तयारी दर्शवली तर प्रत्यक्षात दोघांनी कन्फर्मेशन दिल्याचे कुलगुरूंनी सांगितले. आतापर्यत 6 हजार प्रतिनिधींची नोंदणी झाली आहे. इंडियन सायंस काँग्रेसला जोडूनच चिल्ड्रेन सायंस तसेच वुमेन सायंस काँग्रेसचेही आयोजन केले आहे. चिल्ड्रेन सायंस काँग्रेससाठी देशभरातून सुमारे 120 मुलांची निवड केली आहे. यात स्थानिक संशोधक, अभ्यासक, पीएच.डी धारक, विज्ञानाचे विद्यार्थी आदींना खूप फायदा होणार आहे. नोबेल पारितोषिक विजेत्यांसोबत चर्चा व संवादाचा कार्यक्रम राहाणार आहे. चिल्ड्रेन सायंस काँग्रेससाठी येणाऱ्या मुलांची व्यवस्था विद्यापीठाच्या वसतिगृहात केली जाणार आहे.
दहा ते बारा प्रतिनिधी उपस्थित राहणार
नागपूर येथे होणाऱ्या 108 व्या भारतीय विज्ञान काँग्रेसला एकूण 10 ते 12 हजाराच्या दरम्यान उपस्थिती अपेक्षित आहे. 100 हून अधिक प्लेनरी वक्ते व प्रख्यात तज्ज्ञांकडून 400 हून अधिक आमंत्रित भाषणे असतील. एकूण संशोधन पेपर (तोंडी आणि पोस्टर) सादरीकरणांची संख्या 3,000 पेक्षा जास्त असेल. जवळपास 100 रिसोर्स पर्सन विविध साइड इव्हेंटमध्ये सहभागींना मार्गदर्शन करतील. 500 हून अधिक आदिवासी प्रतिनिधी आणि 1,000 शेतकरी या कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. चिल्ड्रन्स सायन्स काँग्रेसमध्ये जवळपास 500 प्रतिनिधी आहेत सायन्स अँड सोसायटी विभागात सुमारे 100 प्रतिनिधी आहेत आणि सायन्स कम्युनिकेटर्स मीटमध्ये आणखी 100 सहभागी होणार आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.