आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नागपूर:85 वर्षीय व्यक्तीने तरुण गंभीर रुग्णासाठी सोडला ऑक्सिजन बेड; घरी जाऊन घेतला अखेरचा श्वास

नागपूर10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जगाचा निराेप घेण्यापूर्वी संघ स्वयंसेवकाने पराेपकाराचे महत्त्व केले अधाेरेखित
  • डॉक्टरांना म्हणाले- मी माझे आयुष्य जगलोय, आता या तरुणाला वाचवणे महत्वाचे

कोरोना साथरोगाच्या प्रकोपामुळे ऑक्सिजन, औषधे आणि रुग्णालयात जागा मिळेनाशी झालीय. अशा परिस्थितीत नागपुरातील नारायण भाऊराव दाभाडकर या ८५ वर्षीय संघ स्वयंसेवकाने रुग्णालयातील बेड नाकारून एका तरुणासाठी जागा मोकळी करून दिली. त्यानंतर अवघ्या तीन दिवसांनी दाभाडकर यांचे निधन झाले. परंतु, जगातून निरोप घेण्यापूर्वी त्यांनी परोपकाराचे महत्त्व अधोरेखित केले.

नारायण दाभाडकर यांचे कुटुंबीय कोरोना पॉझिटिव्ह असल्यामुळे त्यांच्या कौटुंबिक स्नेही आणि भाजप युवा मोर्चाच्या नागपूर शहराध्यक्ष शिवानी दाणी-वखरे यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, द्वितीय सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर यांनी “सेवेच्या यज्ञकुंडात स्वयंसेवकांनी समिधा बनावे” असा उपदेश दिला होता. दाभाडकर तो उपदेश स्वयंसेवक आदेश म्हणून पालन करतात. अशा स्वयंसेवकांमध्ये नारायण दाभाडकर हे नाव जोडले गेलेय. शिवानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, नारायण दाभाडकर हे लहानपणापासून संघाचे स्वयंसेवक होते. गेल्या काही वर्षांपासून ते आपली मुलगी आसावरी कोठीवान यांच्याकडे वास्तव्याला होते.

काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली. वय अधिक असल्याने प्रकृती खालावली. त्यांची ऑक्सिजन लेव्हल ६० पर्यंत खाली गेली. त्यामुळे त्यांच्या जावयांनी त्यांना इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केलेे. खूप प्रयत्नानंतर दाभाडकर यांच्यासाठी खाटेची व्यवस्था झाली. त्याचवेळी ततिथे एक महिला आपल्या ४० वर्षीय कोरोनाबाधित नवऱ्याला घेऊन पोहोचली. रुग्णालयात जागा नसल्यामुळे त्या महिलेला रडू कोसळले. त्या महिलेची अवस्था पाहून नारायण दाभाडकर यांनी स्वतःचा बेड त्या महिलेच्या पतीला देण्यासाठी आपला बेड रिकामे करीत असल्याचे त्यांनी रुग्णालयाला लिहून दिले. ी दाभाडकर म्हणाले की, “माझे वय ८५ असून मी भरपूर जगून घेतले आहे. या महिलेचा पती तरुण असून त्याच्यावर कुटुंबाची जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांना भरती करून घ्यावे” स्वतःची प्रकृती क्षणाेक्षणी खालावत असूनही दुसऱ्यासाठी रुग्णालयात बेड रिकामा करून दाभाडकर घरी परतले. परंतु, तीन दिवसांनी त्यांचे निधन झाले.

समाजासाठी अनुकरणीय गोडवा मागे सोडून गेले
दाभाडकर यांची आठवण सांगताना शिवानी म्हणाल्या की, दाभाडकर लहान मुलांना चॉकलेट वाटायचे. त्यामुळे मुले त्यांना चॉकलेट काका म्हणत. सच्चे स्वयंसेवक असलेल्या दाभाडकर यांच्या स्वभावात चॉकलेटचा गोडवा होता. त्यामुळे जगाचा निरोप घेण्यापूर्वी स्वयंसेवक म्हणून ते सेवेच्या यज्ञात समिधा बनले. आपल्या योगदानातून समाजासाठी अनुकरणीय गोडवा मागे सोडून गेले. पण, रुग्णालयांमध्ये बेड उपलब्ध असते तर दोघांचाही जीव वाचला असता. वृद्धाला आपला जीव गमवावा लागला नसता. यात दाभाळकर यांच्या बलिदानाचे कौतुक होत असले तरीही सरकार आणि प्रशासनाची मान पुन्हा शरमेने झुकली आहे.

बातम्या आणखी आहेत...