आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षा:खुनाच्या आरोपीला जन्मठेपची शिक्षा ठोठावली

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एम. देशमुख यांनी खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी प्रमोद उर्फ गोलू समलीखराम शाहू (वय ३२) याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रमोद उर्फ गोलू शाहू (वय ३२) व मृतक निरंजन उर्फ गोलू अग्नू वर्मा (वय ३०) हे दोघेही एकाच वस्तीत राहत होते व एकमेकांचे मित्र होते. ५ मे २०२१ रोजी घटनेच्या दिवशी प्रमोद शाहूने निरंजन वर्माला त्याच्या घरी बोलावले. तिथे दोघांत वाद झाला. यात चिडलेल्या प्रमोदने निरंजनच्या डोक्यावर लाकडी दांडक्याने वार करून त्याला जखमी केले. व तिथून पळून गेला. जखमीला घरच्यांनी नागपूर येथील मेयो हाॅस्पिटलमध्ये दाखल केले असता डाॅक्टरांनी तपासून मृत घोषित केले. त्यावरून कलम ३०२ नुसार खुनाचा गुन्हा दाखल केला होता.

बातम्या आणखी आहेत...