आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पळून जाण्याचा अयशस्वी प्रयत्न:कोर्टात नेताना पोलिसाच्या हाताला हिसका मारुन आरोपी फरार, मात्र तीन तासांतच पुन्हा अटक

नागपूर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यायालयात पेशीसाठी आणले असता पोलिसाच्या हाताला हिसडा मारून पळालेल्या आरोपीला तीन तासात अटक करण्यात आली. या घटनेने कामठीत काही काळ खळबळ माजली होती. यापूर्वीही नागपुरात न्यायालयातून तसेच तुरूंगाची भिंत ओलांडून आरोपी पळाल्याच्या घटना घडल्या आहे. यातील अनेक आरोपी दोन तीन दिवसा नंतर तर काही महिना भरा नंतर सापडले. मात्र, कामठीचा आरोपी पोलिसांनी वेळीच खबरदारी घेतल्यामुळे तीन तासात सापडला.

कामठी येथील सराईत गुन्हेगार शेख जाफर पठाण शेख मुजफ्फर (वय 37) हा एका गुन्ह्यात नागपुरातील मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत होता. तो कामठी येथील रमा नगर भागात राहातो. अन्य दोन गुन्हेगारांसोबत शेख जाफर पठाण शेख मुजफ्फर यालाही पोलिसांनी शनिवारी दुपारी कामठी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात आणले होते.

संपूर्ण कामठीत नाकाबंदी

सोबतच्या पोलिसांचे लक्ष नाही असे पाहून शेख जाफरने पोलिसाच्या हाताला हिसडा मारला व काही कळायच्या आत त्याने न्यायालयाची भिंत ओलांडून रेल्वे मार्गाने पळ काढला. यामुळे न्यायालय परिसरात चांगलीच खळबळ माजली. पोलिसांनी कामठी पोलिसांना याची माहिती दिली. आरोपी कामठी येथीलच असल्याने पोलिसांनी संपूर्ण कामठीची नाकाबंदी करीत त्याचा शोध सुरू केला. तीन तासा नंतर तो त्याच्या घराजवळील नाल्याच्या काठावरील झाडीत लपून बसलेला सापडला.

बातम्या आणखी आहेत...