आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासरकार विरुध्द सागर माहुरकर प्रकरणांत खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात जिल्हा न्यायाधीश क्रमांक ११ गणेश देशमुख यांनी आज एका आरोपीस पाच वर्षाची शिक्षा ठोठावली आणि ५ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक वर्षाचा कारावासाची शिक्षा ठोठावली. तर दोघांची निर्दोष मुक्तता केली आहे. सावनेर पोलीस स्टेशन अंतर्गत कृष्णकुमार श्रीवास्तव यांच्यावर खुनाच्या उद्देशाने जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप सागर माहुरकर, सुनिल वाघमारे, अशोक मेश्राम या आरोपींवर होता. याबाबत जखमी कृष्णकुमार श्रीवास्तव यांचा पुतण्या आनंद श्रीवास्तव याने पाटणसावंगी पोलीस चौकीत फिर्याद दिली. त्यानुसार सावनेर पोलीस स्टेशन येथे कलम ३०७, ५०४, ५०६ भादवी नुसार गुन्हा दाखल केला आणि साक्षीदारांचे बयाण नोंदवून आरोप पत्र दाखल केले. यामध्ये विद्यमान न्यायालयाने जखमी कृष्णकुमार श्रीवास्तव यांचे बयाण आणि झालेल्या जखमा ग्राह्य धरुन आरोपी सागर माहुरकर याला कलम ३०७ भादवीचा गुन्हा सिध्द झाल्यामुळे पाच वर्ष शिक्षा आणि पाच हजार दंड ठोठावला आणि न भरल्यास एक महिन्याची साधी कैद तसेच आरोपी सुनिल वागधरे आणि अशोक मेश्राम यांना संशयाचा फायदा देत निर्दोष सोडण्यात आले. हे प्रकरण सरकारतर्फे अभय जिकार यांनी हाताळले. तपास अधिकारी पोलीस उपनिरिक्षक गणेश पाल आणि मदतनीस पोलीस हवालदार मधुकर आदमने यांनी सहकार्य केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.