आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

वर्धा:मुलाने केली जन्मदात्याची टॉवेलने गळा आवळून हत्या, आईच्या तक्रारीवरून पोलिसांत गुन्हा दाखल

वर्धा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बापाला दारुच्या व्यसनाबराेबरच मटक्याची हाेती सवय

आर्वी येथील चोरडिया लेआऊट मधील २४ वर्षीय मुलाकडून जन्मदात्याची गळा आवळून हत्या करण्यात आल्याची घटना घडली असून, युवकास ताब्यात घेण्यात आले असल्याचे पाेलिसांनी सांगितले.

प्राप्त माहितीनुसार, मृतक सुरेश गुलाबराव डकरे वय ५५ रा. चोरडिया लेआऊट आर्वी हा रोजमजुरीचे काम करत होता. त्यांना दारूच्या व्यसनासोबत मटका लावण्याची सवय होती. १२ जुलैच्या रात्री १२ वाजेच्या सुमारास कामावरून घरी आल्यानंतर पत्नी सुनीता (वय ५०) सोबत शाब्दिक वाद घालत अश्लील शिवीगाळ करणे सुरू केले. मुलगा आकाश ऊर्फ आशू डकरे वय २४ हा घरी असल्याने त्याला ते बघवले नाहीत. त्याने रागाच्या भरात जन्मदात्या वडिलांना धक्का दिला. धक्का देताच मृतकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने, मुलाने त्याच्या छातीवर बसून टाॅवेलने गळा आवळून जन्मदात्याची हत्या केली असल्याची घटना घडली. मृतकाची पत्नी सुनीता डकरे या महिलेच्या तक्रारीवरून आर्वी पोलिसांनी भांदवि कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल करत आरोपीस ताब्यात घेतले असून, पुढील तपास पोलिस करत आहे.