आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nagpur
  • The Brutal Murder Of A Young Woman's Grandmother And Younger Brother Out Of One sided Love; The Accused Also Committed Suicide By Jumping Under The Train

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नागपूर:एकतर्फी प्रेमातून तरूणीच्या आजी आणि लहान भावाची निर्घृण हत्या; आरोपीनेही रेल्वेखाली उडी घेऊन केली आत्महत्या

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आरोपीने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजू शकले नाही

एकतर्फी प्रेमात आडकाठी असलेली प्रेमिकेची आजी व तिच्या दहावर्षीय भावाचा निर्दयीपणे खून करणारा आरोपी मोईन खान याने गुरूवारी रात्री मानकापूर रेल्वे पुलावरून उडी घेऊन आत्महत्या केली. त्याने आत्महत्या का केली यामागच्या कारणाचा शोध पोलिस घेत आहेत. मोईन खानने एकतर्फी प्रेमातून गुरुवारी दुपारी हजारी पहाड येथे घरात घुसून आजी व नातवाचा खून केला होता. लक्ष्मीबाई धुर्वे (वय ७०) व यश धुर्वे (वय १०) अशी हत्या झालेल्या दोघांची नावे आहेत.

लक्ष्मीबाई धुर्वे यांच्या नातीचे व आरोपीचे प्रेमसंबंध होते. मात्र हे प्रेमसंबंध लक्ष्मीबाईंना मान्य नसल्याने त्यांनी दोघांच्या भेटीगाठी बंद केल्या होत्या. धुर्वे कुटुंबीयांनी मुलीला मध्यप्रदेशातील नातेवाईकांकडे ठेवले होते. त्यामुळे आरोपी संतापला होता. या विषयावरून त्याने अनेक वेळा धुर्वे कुटुंबीयांना धमक्या देखील दिल्या होत्या. आरोपीने दिलेल्या धमक्यांना गांभीर्याने त्यांनी घेतले नाही. त्यातच गुरूवारी आरोपीने दुपारच्या सुमारास लक्ष्मीबाई धुर्वे आणि त्यांचा नातू यश हे घरी एकटेच असताना बळजबरीने घरात प्रवेश केला आणि त्या दोघांचीही धारधार शस्त्राने वार करुन खून केला. संध्याकाळी लक्ष्मीबाई धुर्वे यांचा मुलगा आणि सून कामावरून घरी परतले तेव्हा या दुहेरी खून प्रकरणाचा खुलासा झाला.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser