आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेमका कधी येणार मान्सून?:पंचांगानुसार 19 जूननंतर पाऊसधारा; 11 पर्यंत उष्णता, दमट वातावरणाचा मारा

नागपूर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

असह्य उकाडा आणि उन्हामुळे अंगाची नुसती काहिली होतेय. भट्टीसारख्या तापलेल्या उन्हामुळे जमीन भाकरीसारखी करपतय. अशात पाऊस आवश्यकय. मात्र, पंचांगकर्त्या विद्या राजंदेकर यांच्या मते विदर्भात १९ जूननंतर पाऊसधारा कोसळतील. पावसाचे पहिले चरण तीन ते चार दिवसांचे असते. त्या नुसार ८, ९, १० व ११ जून या पहिल्या चरणांत उष्णता, गरमी व दमट वातावरण असेल.

दुसऱ्या चरणांत ऊन

विद्या राजंदेकर म्हणाल्या, मंगळवार १४ जून, वटपौर्णिमेपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या चरणांत दिवसा कडक ऊन व संध्याकाळी वादळी वारे असे वातावरण राहील. १४ पासून चंद्र वृश्चिक या जलराशी प्रवेश करीत आहे. त्यामुळे काही अंशी दिलासा मिळेल. १९ जूननंतर आर्द्रा नक्षत्र लागत आहे. २२ जून रोजी सूर्याचा आर्द्रा नक्षत्रात प्रवेश असून वाहन मेंढा असल्याने मेघगर्जनेसह पाऊस येईल.

पावसाचे वाहन गाढव

विद्या राजंदेकर म्हणाल्या, रोहिणी नक्षत्रात मशागत आटोपून शेतकरी मृगात पेरणीला तयार होतो. शेती शिवारात लगबग वाढते, पण यावर्षी मृगाचे वाहन गाढव असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढलीय. हे वाहन दमदार पावसाचे नसल्याचे पंचांगकर्त्यांचे म्हणणे आहे. पावसाचे वाहन म्हैस आणि हत्ती असल्यास मुसळधार पाऊस येतो, पण यावेळेस वाहन गाढव असल्याने फारशी आशा नाही.

पेरणीची घाई नको

देशांत मान्सून दाखल होऊन आठवडा उलटला आहे. विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रात मान्सूनपूर्व सरींनी दिलासा दिला आहे. विदर्भात मात्र कोरडेठक वातावरण आहे. पुरेसा पाऊस आल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन कृषीमंत्री दादा भुसे यांनी केले आहे. मागील वर्षी ९ जून रोजी पाऊस आला होता.

बातम्या आणखी आहेत...