आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चतूर चोर!:घरात काही न मिळाल्याने पळवली कार; दोन्ही संशयिताना अटक, नागपूरमधील प्रकार

नागपूर13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात घरफोडींचे प्रमाण दिवसेंदिवस वाढते आहे. अशातच नागपूरमधून बंद घरावर चोरट्यांनी डल्ला मारल्याचा प्रकार समोर आला आहे. मात्र, घरात काही न मिळाल्याने चतूर चोरांनी शक्कल लढवत स्विफ्ट डिझायर कार पळवल्याची घटना उघडकीस आली आहे.

ही घटना हुडकेवर पोलिस ठाण्याच्या परिसरात घडली. दरम्यान, पोलिसांनी सोमवारी रात्री पॅट्रोलिंगवर असताना चोरी गेलेल्या कारसह चोरट्यांकडील इतर कारही ताब्यात घेतल्या आहेत.

नेमकं घडलं काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुदर्शन नगर येथील सुरेश नारायण राऊत (वय 52) हे सहकुटुंब केरळ येथे देवदर्शनाकरीता गेले आहे. त्यांचे पुतणे अशोक भगवान राऊत शहरात दुसऱ्या ठिकाणी राहातात. त्यांना सुरेश नारायण राऊत यांच्या मोहल्ल्यातील मयूर वेदेश्वर झाडे यांनी सुरेश राऊत यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेले असून अंगणात कारही (ग्रे कलर, एमएच 49, बीके 2712) दिसत नसल्याची माहिती दिली. अशोक राऊत यांनी लागलीच काका सुरेश नारायण राऊत यांना ही माहिती दिली. काकांनी घरी जाऊन पाहाण्यास सांगितले. अशोक राऊत यांनी घरी जाऊन पाहिले असता आलमारी फोडलेली असून सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. त्यावरून अशोक राऊत यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी प्रशील उर्फ मोन्या रायडर संजय जाधव (वय 20) व ललित गणेश रेवतकर (वय 20) या दोघांना अटक केली आहे. तर आदर्श समर्थ व धवल मून हे फरार आहे.

दोघांना अटक

पोलिस उपनिरीक्षक प्रमोद खंडार, हवालदार मनोज नेवारे हे पथकासह रात्र गस्तीवर असताना खबऱ्याने दिलेल्या माहितीवरून बेसा चौकात नाकाबंदी केली. त्यावेळी एमएच 49, एफ 1605 क्रमाकांची टाटा इंडीगोमधून दोघे जण येताना दिसले. त्यांना थांबवून विचारपूस केली असता उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांचा संशय बळावला. त्यांनी त्यांची नावे प्रशील उर्फ मोन्या रायडर संजय जाधव (वय 20) व ललित गणेश रेवतकर (वय 20) अशी सांगितली. त्यांना पोलिस ठाण्यात आणून विचारपूस केली असता राऊत यांच्या घरा व्यतिरिक्त इतर ठिकाणी केलेल्या चोरीची माहिती दिली.

गुन्ह्याती दिली कबूली

या दोघांचे मित्र असलेले आदर्श समर्थ व धवल मून यांच्या पल्सर गाडीने सुदर्शन नगरातील राऊत यांच्या घरी चोरी केली. परंतु हाती काहीच लागले नाही. म्हणून कार घेऊन गेल्याची कबुली दिली. दोघांनाही अटक करण्यात येऊन त्यांच्याकडील कार जप्त करण्यात आली. तसेच गुन्ह्यात वापरलेली एमएच 31, एफडी 3576 क्रमाकांची बुलेट ताब्यात घेतली. चोरून नेलेली ग्रे कलरची स्विफ्ट डिझायर कार अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत अपघातग्रस्त आढळली.

बातम्या आणखी आहेत...