आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गडचिरोली:जिल्हाधिकाऱ्यांनी शेकापच्या शिष्टमंडळाला राज्यपालांना भेटण्याची दिली परवानगी

गडचिरोली6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गडचिरोली जिल्ह्यातील खनन विरोधी भूमिकेवरून राज्यपालांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्याची मागणी जिल्हा प्रशासनाने नाकारल्यामुळे शेकाप नेते भाई रामदास जराते यांनी घोषणा केल्याप्रमाणे आज सकाळी १०.३० वाजता आपल्या कार्यकर्त्यांसह स्वतः पोलीस स्टेशनमध्ये जाऊन अटक करून घेण्याची मागणी केली. यामुळे धास्तावलेल्या जिल्हा प्रशासनाने जराते यांना चर्चेसाठी बोलावले होते. या चर्चेत अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी शेकाप च्या शिष्टमंडळाला राज्यपालांना भेटण्याची परवानगी दिली आहे.

राज्यपालांच्या दौऱ्यादरम्यान त्यांना प्रत्यक्ष भेटून जिल्ह्यात आदिवासी विरोधाला न जोमानता बळजबरीने सुरू केलेल्या लोह खाणी विरोधात राज्यपालांकडे आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी शेकाप ने जिल्हाधिकाऱ्यांना भेटीसाठी वेळ आणि पासेस मागितल्या होत्या. परंतु जिल्हा प्रशासनाने त्यांना भेटीसाठी वेळ व पासेस उपलब्ध करून दिल्या नाही. प्रशासनाच्या या भूमिकेचा निषेध म्हणून ते स्वतःला अटक करून घेण्यासाठी गडचिरोली पोलीस स्टेशनमध्ये गेले असताना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून चर्चेसाठी बोलवण्यात आले होते. या चर्चेत शेकाप च्या शिष्टमंडळाला राज्यपालांना भेटण्याची परवानगी देण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...