आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस:तक्रारदारच निघाला चोर; लुटल्याचा बनाव केल्याचे चौकशीत उघड

नागपूर8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रोख रक्कम रस्त्यात लुटण्याच्या प्रकरणात जबरी चोरीच्या गुन्ह्यात तक्रारदार चोर निघाल्याची घटना उघडकीस आली. तसेच लुटल्याचा बनाव केल्याचे चौकशीत उघड होताच ग्रामीण पोलिसांनी संशयित आरोपीच्या मुसक्या आवळल्या. राकेश वसंतराव झिलपे (वय 37) असे संशयित आरोपीचे नाव आहे.

कंपन्यांमध्ये कनेक्शनचे काम करतो

राकेश वसंतराव झिलपे हा वेगवेगळ्या कंपन्यांमधून कलेक्शन करतो. त्याने नेहमी प्रमाणे 6 लाख 29 हजार 600 रुपयांचे कलेक्शन केले, एमएच 40, बीयू 6877 क्रमाकांच्या मोटरसायकलवरून गुमथळ्याकडून तो गुमथी मार्गे सावनेरकडे जात होता. दरम्यान गुमथी शिवारातील मुख्य डांबरी रस्त्यावर नंबर प्लेट नसलेल्या मोटरसायकलवर आलेल्या दोघांनी झिलपे याला चाकूचा धाक दाखवून तसेच जीवे मारण्याची धमकी देत लुटले. झिलपे यांच्या तक्रारीवरून खापरखेडा पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

गुन्ह्याची दिली कबुली

या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांना फिर्यादी झिलपे याचा संशय आला. त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता प्रशांत रामराव वरठी या मित्राच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली. लुटीतील रक्कम वरठी याच्या घरी ठेवल्याचे सांगितले. झिलपे याला घेऊन पोलिस वरठीच्या घरी गेले असता तो घरी नव्हता. त्याच्या पत्नीकडे चौकशी केली असता तिने प्रशांत वरठी याला फोन करून विचारले. त्यावेळी बेडरूममधील ड्रेसिंग टेबलच्या मागे एका जांभळ्या रंगाच्या पिशवीत पैसे ठेवल्याचे सांगितले. तिच्या समक्ष पिशवी काढून तपासली असता 2000, 500 व 100 रुपयांच्या बंडमध्ये 5 लाख 74 हजार रुपये आढळून आले. ऑफिस बॅगमधील धनादेश प्रशांत वरठीच्या मदतीने जाळलेल्या झिलपे याने सांगितले. या प्रकरणी झिलपेला अटक करण्यात आली

आरोपीच्या आवळल्या मुसक्या

500 व 100 रूपयांच्या बंडलमध्ये 5 लाख 74 हजार रूपये आढळून आले. ऑफिस बॅगमधील धनादेश प्रशांत वरठीच्या मदतीने जाळल्याचे झिलपे याने सांगितले. या प्रकरणी झिलपेला अटक करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...