आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी दिला आंदोलनाचा इशारा

गोंदिया11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमात मागील २२ वर्षांपासून विविध पदावरील २२०० कंत्राटी कर्मचारी जीवाचे रान करीत आहेत. परंतु, या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात शासनाकडून वारंवार अन्यायकारक निर्णय घेतले जात आहेत. त्यांच्या विविध मागण्यांसाठी शासनास संघटनेच्या वतीने वेळोवेळी निवेदने देवून पाठपुरावा करण्यात आला. मात्र शासनाने अद्याप कोणतेही सकारात्मक निर्णय घेतले नाही. त्यामुळे राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमातील सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले असून, जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले आहे.

सर्व क्षयरोग कंत्राटी कर्मचारी शासनाचा निषेध नोंदवण्यासाठी १३ सप्टेंबरपासून दररोज काळी फीत लावून कर्तव्य पार पाडत आहेत. तर २९ व ३० सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे-आंदोलन करणार आहेत. तसेच १ ते ६ ऑक्टोबर दरम्यान कामबंद आंदोलन करणार, असा इशारा निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला.यावेळी क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमातील कंत्राटी कर्मचारी भोजेंद्र बोपचे, पवन वासनिक, रामचंद्र लिल्हारे, संजय रेवतकर, संजय भागवतकर, राजू मेश्राम, हरिश चिंधालोरे, रिजवाना शेख, देवेंद्र भाजीपाले, मंजुश्री मेश्राम, अनुप बनसोड, रवी फरदे, दीपक चव्हाण, उर्मिला बघेले, चंद्रकांत भुजाडे, प्रज्ञा कांबळे, पंकज लुतडे, योगिता अडसड, आकाश चुन्ने, रोशन भैसारे, धनेंद्र कटरे, अमित मंडल, दिनेश डोंगरवार, सी.एस. मिश्रा आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...