आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादग्रस्त पुरीचा गणपती खुला होण्याआधीच झाला बंदिस्त:स्थापना करू न देताच पाचपावली पोलिसांनी खोलीला लावले कुलूप

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नागपुरातील गुलाब पुरी यांचा गणपती गणेशस्‍थापनेच्या निमित्ताने हाताळण्यात येणाऱ्या वादग्रस्त विषयांमुळे राज्यात प्रसिद्ध आहे. 50 वर्षांपूर्वी पाचपावली परिसरातील सामाजिक कार्यकर्ते गुलाब पुरी यांनी वादग्रस्त देखाव्यातून सामाजिक संदेश देणारा गणपती प्रतिष्ठापित करण्याची परंपरा सुरू केली. हा गणपती गणेश चतुर्थीच्या दिवशी स्थापना न करता गणेशोत्सवा दरम्यानच्या कुठल्याही दिवशी स्थापन केला जातो. त्यांचे नातु शिवम पुरी यांनी यावर्षीही परंपरेप्रमाणे देखाव्यासह गणपती तयार केला. परंतु पोलिसांनी यावर्षी गणपती स्थापन होण्यापूर्वीच गणपती असलेल्या खोलीलाच कुलूप लावले.

पोलिसांच्या या दडपशाही विरोधात शिवम पुरी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दरवर्षी गणपती स्थापन झाल्यानंतर मूर्ती व देखावे जप्त केले जातात. कोणत्याही परिस्थितीत आपण गणपतीची स्थापना करणारच असल्याचे शिवम पुरी यांनी सांगितले.

पूर्वी गुलाब पुरी यांनी गणपतीची स्‍थापना केली की लगेच ती मूर्ती पोलिस जप्त करायचे. चंद्रशेखर आझाद गणेश मंडळाच्यावतीने पुरी हे गेल्या अनेक वर्षांपासून गणपतीची स्थापना करतात. त्यासोबत ज्वलंत सामाजिक समस्यांवर आधारित देखावेही असतात. 1993 साली गुलाब पुरी यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांचे चिरंजीव चंद्रशेखर, नरेंद्र यांनी ही परंपरा कायम ठेवली आहे. 2005 साली न्यायालयाने पुरींना गणपतीची प्रतिष्ठापना करू देण्याचे आदेश दिले होते. 2010 साली पुरी यांनी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या प्रतिमा उभारल्या होत्या. त्यामुळे त्यावेळी पोलिसांनी या प्रतिकृती जप्त केल्या होत्या. तर 2019 मध्ये ‘प्रत्येक नागरिकाच्या खात्यात १५ लाख जमा होणार होते ते कुठे आहेत’, असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारण्यात आला होता. 2020 मध्ये परवानगी नाकारली होती.

2021 मध्ये काेरोना काळात गंगेत मोठ्या प्रमाणावर अर्धवट जळालेले मृतदेह फेकण्यात आले, कोरोना महामारीने जनता त्रस्त असतानाच पेट्रोल डिझेल व स्वयंपाकाच्या गॅसच्या दरवाढीने सामान्यांना जगणे कठीण झाले आहे, शेतकरी, व्यापारी व मजूरांना कोणी वाली राहिला नाही तर वैदर्भीय नेत्यांच्या मूग गिळून बसण्यावरही तिखट शेरेबाजी करण्यात आली होती.

बातम्या आणखी आहेत...