आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोष सिद्धीची टक्केवारी तब्बल 58 टक्के वाढली:नागपूर पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांची माहिती

नागपूर5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूरसारख्या महानगरात रोज गुन्हे घडतात, गुन्हेगार देखील पकडले जातात, त्यापैकी काहीं आरोपींना शिक्षा होते. मात्र,बहुतांश आरोपी हे पुराव्या अभावी मोकाट सुटतात. वर्षभर एकूण दाखल झालेल्या गुन्ह्यापैकी किती आरोपींना शिक्षा झाली याचा आढावा घेतला तर पूर्वी हा आकडा 10 ते 25 टक्यांच्या घरात असायचा.

मात्र, यावर्षीच्या10 महिन्यात दोष सिद्धीची टक्केवारी तब्बल 58 टक्के झाली असल्याची माहिती शहर पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी बुधवारी माध्यमांशी बोलताना दिली आहे. 2004 साली नागपूरात दोष सिद्धीचे प्रमाण केवळ 10 टक्के होत. 2014 साली हा आकडा 15 टक्क्यांपर्यंत पोहोचला होता. परंतु यावर्षीच्या 9 महिन्यात नागपूरात दोष सिद्धीचे प्रमाण 58 टक्यांवर गेले आहे.

पोलिस ठाण्यात एकदा गुन्हा दाखल झाला की त्या गुन्हेगाराला अटक केली जाते. गुन्हेगाराला अटक झाल्यानंतर पोलिसांचे काम संपले असे होत नाही. गुन्हेगाराला अटक झाल्यानंतर त्याला शिक्षा मिळेपर्यंत पोलिसांचे कर्तव्य पूर्ण होत नाही. पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेचे प्रमाण हे दोष सिद्धतेवरून ठरते. त्यामुळे दोष सिध्दीचे प्रमाण वाढेल अशा रितीने गुन्ह्यांचा तपास करा असे निर्देश पोलिस आयुक्तांनी यांनी दिले होते. गेल्या दोन वर्षांपासून त्यादृष्टीने प्रामाणिक प्रयत्न सुरू आहे. त्यामुळेच या वर्षीच्या १० महिन्यात नागपुरात दोष सिद्धीचे प्रमाण 58 टक्यांपर्यत गेले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत 12 टक्यांची वाढले आहे हे विशेष.

तंत्रज्ञानाची मदत महत्वाची

तंत्रज्ञानाच्या मदतीने पोलिस कुठेही लपून बसलेल्या गुन्हेगारांपर्यत पोहचू शकतात. आणि त्याच तंत्रज्ञानाच्या मदतीने गुन्हेगारांवरील दोष सिद्ध होण्यास मदत मिळत आहे.

2004 साली दोष सिद्धीचे प्रमाण केवळ 10 टक्के

नागपूर पोलिसांनी गुन्हेगाराला पकडल्यानंतर त्याच्यावरील आरोप सिद्ध कसे होतील यावर लक्ष केंद्रित केल्यामुळे यावर्षीच्या 10 महिन्यात दोष सिद्धीची टक्केवारी 58 टक्के इतकी झाली असली तरी 2004 साली हे प्रमाण केवळ 10 टक्के इतके होते. 2005 यावर्षी दोष सिद्धीचे प्रमाण केवळ 8 टक्के होते तर पुढच्या वर्षी म्हणजे 2006 साली 9 टक्के इतकेच होते. 2007 आणि 2008 साली तर दोष सिद्धीचे प्रमाण केवळ 6 टक्के इतके होते. 2009 साली 3 टक्यांची हे प्रमाण वाढल्यानंतर 2010 केवळ 5 टक्के आणि 2011 साली तर केवळ 4 टक्के गुन्हेगारांना त्यांनी केलेल्या गुन्ह्याची शिक्षा मिळाली.

बातम्या आणखी आहेत...