आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गडचिरोली:नक्षल चळवळीला हादरा म्हणजेच गडचिरोलीचा विकास - गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

गडचिरोली14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नक्षलवाद्यांच्या कारवायांमुळे गडचिरोलीचा विकास खुंटला होता. गडचिरोली पोलिसांनी मागिल 10 वर्षांपासून नक्षलवाद्यांच्या कारवायांना आळा घालत चकमकींतून, खात्मा करीत, आत्मसमर्पण घडवून आणत जिल्हाभर सेवाभावी कार्य करीत जनतेचा विश्वासही अर्जित केला. त्यावर मरदीनटोलाच्या चकमकीत शौर्यपूर्ण कामगिरी करीत माओवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य मिलींद तेलतुंबडे सह अन्य २६ मोठ्या कॅडरचा खात्मा करण्यात यश मिळविले. त्यामुळे गडचिरोलीसह महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड येथील नक्षलवादी चळवळीला मोठा हादरा बसला. देशविघातक शक्तींचा नाश हाच विकासाच्या प्रशस्तीकरणाचा मार्ग होय असे प्रतिपादन महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सोमवारी गडचिरोलीत केले. ते शौर्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या जवानांना शुभेच्छा देण्यासाठी गडचिरोलीत आले होते.

पोलिस मुख्यालयात पोहोचून त्यांनी शहीद स्मारकावर दिव्यांगत पेालिसांना आदरांजली वाहिली. नक्षलविरोधी कामगिरी बजावतांना शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांची त्यांनी भेट घेतली. यावेळी शहीदांच्या कुटुंबियांच्या पाठीशी सरकार भक्कमपणे उभे असून त्यांच्या सर्व मागण्यांची दखल शासनाने घेतली असल्याचे त्यांनी सांगितले. अनुकंपा तत्वावर नोकरीच्या संदर्भात सरकार लवकरच निर्णय घेणार असल्याचे ते म्हणाले. पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देतांना ना. वळसे पाटील म्हणाले की गडचिरोलीच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. सरकारने गडचिरोलीतील चार मोठ्या पुलांसाठी १५० कोटी रूपयांची तरतूद केलेली आहे. त्रिपुरामधील घटनेचे महाराष्ट्रात पडसात उमटत असून मालेगाव, अमरावती, नांदेड आणि इतर ठिकाणी सुरू झालेल्या घटनांच्या चौकशीचे गुन्हेविभागाला आदेश देण्यात आले आहे. चाॅइस पोस्टींगच्या भुमिकेसंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.

केंद्र सरकार काहीही करू शकते
ईडी आणि सीबीआय या केंद्रीय तपास यंत्रणांना केंद्र सरकारने पाच वर्षाची मुदतवाढ दिली आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री म्हणून आपली काय प्रतिक्रिया आहे या प्रश्नाच्या उत्तरात 'ते केंद्र सरकार आहे. काहीही करू शकते' असा उपरोधिक टोला गृहमंत्र्यांनी लगावला.

बातम्या आणखी आहेत...