आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आ. आदित्य ठाकरे म्‍हणाले:बिथरलेल्या गद्दारांना दसरा मेळाव्याचे निमित्त मिळाले

नागपूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दसरा मेळाव्याची परवानगी मिळते की नाही ते नंतर बघू. पण या गद्दारांना निमित्त पाहिजे होते. कारण लोकांसमोर त्यांचा मुखवटा फाटलेला आहे. माझ्या शिवसंवाद यात्रांना महाराष्ट्रात तुफान प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे बिथरलेले गद्दार निमित्त शोधत हाेते. ते त्यांना दसरा मेळाव्याच्या निमित्ताने मिळाल्याची घणाघाती टीका शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी नागपूर विमानतळावर माध्यमांशी बोलताना केली.

दसरा मेळावा हा शिवसेनेचा असतो व शिवसेनेचाच राहणार आहे. आम्ही परवानगीसाठी सतत प्रयत्न करीत आहोत. आम्ही अर्ज देणार आहोत. पण हे सरकार आमचा अर्ज स्वीकारायला तयार नाही. हे सरकार दडपशाही करत असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला. मूळ शिवसेना कोणाची आहे हे सर्वांनाच माहिती आहे. शिवसेना खरी आणि खोटी असे काही नाही. शिवसेना ही शिवसेनाच आहे. गद्दार शिवसेनेतून बाहेर पडले आहेत. जनता यापूर्वीही आमच्यासोबत होती आणि पुढेही आमच्यासोबतच राहील, असे ठाकरे यांनी ठणकावले. शिवसेनेने कुठेही भूमिका सोडलेली नाही. शिवसेनेची भूमिका नेहमी कायम आणि स्पष्ट राहिलेली आहे. सगळ्यांना सोबत घेऊन चालणे हीच आमची भूमिका आहे. आमची मते आणि भूमिका ज्यांना पटेल ते आमच्यासोबत येतील. महाविकास आघाडी सरकारमध्येही आम्ही महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी एकत्र आलो आणि सोबत राहिलो.

गद्दार सरकारमागे कोणी नाही, जनता शिवसेनेसोबतच.. िवधिमंडळ अधिवेशनात सत्ताधाऱ्यांनी पायऱ्यांवर धरणे दिले. यापूर्वी कधी सत्ताधाऱ्यांना असे पायऱ्यांवर उभे पाहिले आहे काय, असा सवाल करतानाच या गद्दार सरकारच्या मागे कोणी नाही. जनता शिवसेनेसोबत असल्याचा पुनरुच्चार ठाकरे यांनी केला. आम्ही काय कमी केले म्हणून यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसून असे निघून गेले, असा सवालही ठाकरे यांनी केला.

बातम्या आणखी आहेत...