आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मागणी:‘माझे बाबा झिंगून घरात यावेत हे आदित्यदादांना तरी रुचेल का ?’ दारूबंदीसाठी आठवीतील चिमुकलीची मुख्यमंत्र्यांना भावनिक साद

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी कायम ठेवावी, चिमुकलीची मागणी

मद्यपी चालकाने माझ्या तेजसदादाच्या गाडीला धडक मारावी का? आणि माझे बाबा झिंगून घरात यावे हे आदित्यदादांना रुचेल का, असे प्रश्न करत चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरीतील आठवीतल्या विद्यार्थिनीने दारूबंदी कायम ठेवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहीत भावनिक साद घातली आहे. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी कायम ठेवावी, अशी मागणी तिने केली आहे.

या जिल्ह्यांतील दारूबंदी उठवण्याच्या राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. या दोन जिल्ह्यांतील दारूबंदी कायम ठेवावी की ठेवू नये यासंबंधी समिती स्थापण्यात आली. मात्र, आदिवासींनी याविरोधात लढा पुकारला आहे. याचाच भाग म्हणून चंद्रपूरमधील आठवीच्या मुलीने दारूबंदीच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाच पत्र लिहिले आहे.

मद्यपी वाहनचालकाने निरपराध जनतेला चिरडून जावे किंवा माझ्या तेजसदादाच्या गाडीला धडक मारावी या विचारानेही अंग शहारते. आपण सर्व राजमाता जिजाऊ माँसाहेब यांचे वंशज आहोत आणि माँ जगदंबेची ओटी कुटुंब उद्ध्वस्त करणाऱ्या करातून आम्ही कशी काय भरणार? माझे बांधव, माता-भगिनी आनंदाने, सुखाने नांदोत, अशी मागणी आपणच आपले सर्वांचे दैवत पंढरीच्या विठोबांकडे करतो. मग दारूबंदी उठवावी, हा आपल्या मंत्रिमहोदयांचा अनाठायी आग्रह का असावा?’ असा सवालही या आदिवासी मुलीने केला आहे.

१९६३ मध्ये गडचिरोलीतील गावागावांत आदिवासींनी परंपरेनुसार अनवाणी पायांनी मुंबईला जाऊन तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांची भेट घेतली होती. या वेळी त्यांनी शरद पवारांना दारूबंदीसाठी सहा वर्षे सुरू असलेल्या आंदोलनांची माहिती दिली आणि आपल्या भावना पोहोचवल्या होत्या, असेही या मुलीने पत्रात नमूद केले आहे.