आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:​​​​​​​गोंडी भाषेतून शिक्षण देणारी राज्यातील पहिली शाळा गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम मोहगावात सुरू

नागपूर11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मातृभाषा दिनाच्या निमित्ताने ‘पारंपरिक कोया ज्ञानबोध संस्कार गोटूल’शाळा
  • गोंडी भाषेतून शिक्षण देणारी राज्यातील पहिली शाळा गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम मोहगावात सुरू

गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम धानोरा तालुक्यातील माेहगाव येथे गोंडी भाषेतून शिक्षण देणारी राज्यातील पहिली शाळा सुरू करण्यात आली आहे. बोलीभाषा ही त्या त्या समाजाची किंवा समूहाची परंपरा, रचना ओळख, स्वाभिमान सांगणारे माध्यम आहे. प्रत्येकाला त्याची मातृभाषा हवी आहे. त्यामुळे गोंड आदिवासी समाजाने गोंडी भाषेचे अस्तित्व टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे स्वाभाविक आहे. त्या दृष्टिकोनातून ही शाळा सुरू करण्यात आली.

जागतिक मातृभाषा दिनाच्या पर्वावर “पारंपरिक कोया ज्ञानबोध संस्कार गोटूल’ या नावाने ग्रामसभेला प्राप्त अधिकारान्वये गोंडी भाषेतून शिक्षण देणारी राज्यातील पहिली शाळा सुरू करण्यात आली. शाळेचे उद्घाटन गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी मुख्याध्यापिका यशोधरा उसेंडी व गोंडी समाजसेवक गणेश हलामी, देवसाय पाटील आतला हे प्रामुख्याने उपस्थित होते.

स्वतंत्र लिपी क्रमबद्ध करण्याचा प्रयत्न
छत्तीसगड, मध्य प्रदेशात गोंडी बोली भाषेचे प्रशिक्षण दिले जाते. परंतु त्यांची लिपी ही देवनागरी आहे. देवनागरीला समांतर अशी गोंडी, मुंडारी आणि कोरकू या बोली भाषांची स्वतंत्र लिपी आहे, ती क्रमबद्ध करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाईल, असे मुख्याध्यापिका यशोधरा उसेंडी यांनी या प्रसंगी सांगितले.

तीन विद्यार्थिनी देणार शिक्षण
अंगणवाडी स्तरावरील १५ विद्यार्थ्यांसह ही शाळा गोंडी बोलीभाषेतून आदिवासी विद्यार्थ्यांना गोटूलचे पारंपरिक संस्कार व शिक्षण देणारे केंद्र ठरणार आहे. शाळेत रूक्ता उसेंडी (विज्ञान शाखेची पदवीधर), राजकुमारी कोराम (कला पदवीधर) व रीना आतला या विद्यार्थिनी आदिवासी विद्यार्थ्यांना गोंडी भाषेचे धडे देणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...