आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वर्धा:चारचाकी वाहनाने उभ्या ट्रकला दिली धडक; भीषण अपघातात 4 ठार तर 5 युवक जखमी

वर्धा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वाहन चालकाचे नियंत्रण सुटले, गणपतीपुळे येथे जात असताना घडला अपघात

उमरखेड तालुक्यातील नवयुवक राष्ट्रीय महामार्गाने गणपतीपुळे येथे दर्शनासाठी जात असते वेळी वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने बंद अवस्थेत असलेल्या उभ्या ट्रकला भीषण धडक दिली. या दिलेल्या धडकेत 4 ठार तर सहा गंभीर जखमी झाले असल्याची घटना दिनांक 4 जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास हिंगणघाट येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सामोर घडली.

उमरखेड तालुक्यातील हिवरा हीवरी येथील युवक रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे येथे दर्शनासाठी एम एच 40 के आर 6482 या बोलेरो वाहनाने राष्ट्रीय महामार्गाने जात होते. हिंगणघाट येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सामोर बंद अवस्थेत असलेला ट्रक क्रमांक एम एच 29 टी 1009 या ट्रकला दिनांक 4 जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास पाठीमागून भीषण धडक दिली. या दिलेल्या धडकेत वाहन चालक शैलेश पंढरी गिरसावळे वय 26 , आदर्श हरिभाऊ कोल्हे वय 17 , सूरज जनार्धन पाल वय 22 या तिघांचा घटनास्थळी मृत्यू झाला. तर यश कोल्हे वय 12, भूषण राजेंद्र खोंडे वय 24, शुभम प्रमोद पाल वय 23, प्रणय दिवाकर कोल्हे वय 15 समीर अरुण मोंढे वय 16 व मोहन राजेंद्र मुंढे वय 22 सहा युवक गंभीर जखमी अवस्थेत असल्यामुळे त्या सर्वांना सेवाग्राम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या दरम्यान मोहन मुंढेचा मृत्यू झाला.

वाहन चालक मद्यपान करुन वाहन चालवत असल्यामुळे त्या वाहन चालकाचे वाहनांवरील नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात घडला. या अपघातात नवयुवकाचा मृत्यू झाला आहे. या भीषण अपघाताची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी भिवराव टेडे ,पोलीस निरीक्षक संपत चव्हाण , वाहतूक पोलीस शिपाई अजर खान, नितीन राजपूत , प्रदीप राठोड, अमोल आडे रात्री घटनास्थळी दाखल होत जखमींना रुग्णालयात दाखल केले. पुढील तपास हिंगणघाट पोलीस करीत आहे.

बातम्या आणखी आहेत...