आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

मिशन बिगिन अगेन:25% प्रेक्षकांच्या उपस्थितीत मल्टिप्लेक्स थिएटर सुरू करण्याचा सरकारचा विचार

नागपूर/ शिर्डी3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोविडच्या भीतीने किती प्रेक्षक सिनेमागृहांकडे वळतील याबद्दलही शंका

मिशन बिगिन अगेन अंतर्गत हळूहळू अनेक गोष्टींना परवानगी मिळत आहे. छोटा पडदा पुन्हा सुरू झाला आहे. आता मायबाप सरकारने मोठा पडदाही सुरू करावा, अशी मागणी िवतरक व प्रदर्शकांची सर्वात मोठी संघटना असलेल्या सेंट्रल सर्किट सिने असोसिएशनने केली आहे. असोसिएशनचे उपाध्यक्ष लोकेंद्र जैन यांनी चित्रपटगृहातही कोरोना नियमांचे संपूर्ण पालन करण्यात येईल, असे सांगितले.

दरम्यान, राज्यभरातून होत असलेल्या या मागणीच्या अनुषंगाने राज्य सरकारने सिनेमागृह सुरू करताना २५ टक्के प्रेक्षकांची अटक टाकली आहे. या अटीमुळे सिनेमागृहे चालवायची कशी असा प्रश्न आहे . २५ वरून ५० टक्के प्रेक्षकांना परवानी द्यावी तसेच इतर उद्योगांप्रमाणे जीएसटीत, वीज बिल व करात सवलतीसाठी राज्यातील थिएटर मालक आग्रही आहेत . राज्य सरकार यात कायम मार्ग काढते यावरच राज्यातील चित्रपटगृह सुरू होण्याचे भवितव्य अवलंबून आहे.

राज्यात सुमारे ६११ डिजिटल सिमेनागृहे आहेत. त्यात १८९ मल्टीप्लेक्स चा समावेश आहे . दररोज एक लाखांहून अधिक प्रेक्षक सिनेमाचा आनंद घेत असतात. या माध्यमातून शेकडो कोटीचा महसूल जमा होतो .याशिवाय २० टक्के जीएसटीच्या माध्यमातून मोठी रक्कम सरकारला मिळत आहे.

काेराेनाच्या संकटामुळे मागील १५० दिवसांपासून राज्यात चित्रपटगृह बंद आहेत. मात्र ही चित्रपटगहे बंद असतानाही विद्युत बीले व कर्मचारी ,स्वच्छता ,दैनंदीन सर्विसिंग आदींवर होणारा खर्च सिनेमागृह चालकांना सोसावा लागत आहे.

प्रेक्षकांबाबत हा दिला दाखला

कोविडचे संकट नसतानाही सोमवार ते शुक्रवार दरम्यान सिनेमा थिएटरमध्ये सर्वसाधरणपणे १० टक्केच प्रेक्षकांची संख्या असते. वीकएन्ड म्हणजेच शनिवार व रविवार या दोन दिवशी ५० टक्क्यावर प्रेक्षकांची संख्या असते. कोविडच्या भीतीने किती प्रेक्षक सिनेमागृहांकडे वळतील याबद्दलही शंका असल्याने २५ टक्के प्रेक्षकही येतील की नाही याबद्दल चालकांना शंका आहे.

दरम्यान, कोविडमुळे निर्माण झालेली परिस्थिती किती दिवस राहील, हे कुणीही सांगू शकत नाही. आगामी दोन महिन्यांनंतर तरी स्थिती सुधारेल, असे ठामपणे सांगता येत नसल्याने कामगार, कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचे महाराष्ट्र चित्रपट फिल्मचे मुख्य वितरक डॉ. सुनील पाटील म्हणाले.

चित्रपट सुरू करून चालणार नाही तर नवीन चित्रपट प्रदर्शित व्हायला हवेत. २५ टक्के प्रेक्षकांवर हा उद्योग चालवणे शक्य होणार नाही, असे शिर्डी येथील नाथगंगा मल्टिप्लेक्सचे धनंजय आहेर यांनी सांगितले.