आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

याचिका फेटाळली:अदानींचा पासपोर्ट जप्तीची मागणी करणारी याचिका हायकोर्टाने फेटाळली

नागपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उद्योगपती गौतम अदानी देशाबाहेर पळून जाऊ नये, याकरिता त्यांचा पासपोर्ट जप्त करण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळली. या प्रकरणी न्या. सुनील शुक्रे आणि न्या. वृषाली जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली असता त्यांनी केंद्र शासनाच्या संबंधित विभागाला निवेदन सादर करण्याचे सांगितले.

हिंडेनबर्ग अहवालानुसार भारतात गौतम अदानी यांनी अडीच लाख कोटी रुपयांचे कर्ज वेगवेगळ्या पब्लिक सेक्टर बँकेतून घेतले. सर्व हजारो कोटी रुपये जनतेचे असून कर्ज घेणारे गौतम अदानी हे देश सोडून जाऊ नयेत, याकरिता सुदर्शन केशव बागडे यांच्यावतीने अ‍ॅड. संतोष चव्हाण, प्रतीक लोहंबरे यांनी मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. गौतम अदानी भारत सोडून पळून जाऊ नयेत, या करिता अदानी यांचा पासपोर्ट जप्त करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी याचिकेव्दारे केली होती. परंतु उच्च न्यायालयाने संबंधित केंद्र शासनाच्या विभागाला निवेदन सादर करण्यास सांगून याचिका नाकारली, अशी माहिती पत्रपरिषदेत केशव बागडे, अ‍ॅड. चव्हाण यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...