आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवराज्याभिषेक सोहळा:किल्ले निर्मितीतून उभा करणार पावनखिंडीचा इतिहास , 21 ढोलताशा पथक एकत्र येऊन महावादन करणार

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

श्री शिवराज्याभिषेक सोहळा समिती, शिवतीर्थ महालतर्फे रविवार 12 जून रोजी शानदार शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होणार आहे. 12 जून रोजी सकाळी 7.30 वाजता शिवतीर्थ, छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक, महाल येथे श्री शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा परंपरागत पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. त्यानंतर नागपुरातील 21 ढोलताशा पथक एकत्र येऊन महावादन करणार आहे. या शिवाय नागपुरातील आखाड्यांनी शिवकालीन क्रीडा प्रात्यक्षिके सादर केली.

यावर्षी या सोहळ्याच्या निमित्ताने पावनखिंडीचा इतिहास जागृत करण्याचा प्रयत्न किल्लेदार करीत आहे. यासाठी पन्हाळगड ते विशाळगड मातीच्या किल्ल्यांची निर्मिती केली जात आहे. कार्यक्रमाला सद्गुरूदास महाराज, श्रीमंत डॉ मुधोजीराजे भोंसले, बाजीप्रभू देशपांडे यांचे 11 वे वंशज संदेश देशपांडे, निवृत्त अतिरिक्त महासंचालक विजय चाफेकर, निवृत्त फ्लाईट लेफ्टनंट शिवाली देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती राहाणार आहे.

8 जून रोजी सायंकाळी 7 वाजता किल्ले मिरवणूक निघणार आहे. 13 जूनला सायंकाळी 7 वाजता व्याख्यान राहणार आहे. राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने चित्रकला, रांगोळी, वक्तृत्व स्पर्धा, प्रश्न मंजुषा, किल्ले निर्मितीची स्पर्धा ठेवण्यात आली आहे. नागरिकांनी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संयोजक दत्ता शिर्के यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...