आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरणालाही उरला नाही संत्रा:वाढत्या तापमानाचा फटका; फळगळतीमुळे विदर्भात 500 कोटींचे नुकसान, शेतकरी अडचणीत

नागपूर17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केवळ कापूस, तूर व सोयाबीन उत्पादकच नव्हे तर संत्रा उत्पादक शेतकरीही आता पुरता संकटात सापडला आहे. रोजच्या बदलत्या हवामानामुळे, तसेच विदर्भात वाढलेल्या उष्ण तापमानामुऴे शेतकऱ्यांचे वळपास 500 कोटींचे नुकसान झाल्याची माहिती महाऑरेंजचे कार्यकारी संचालक श्रीधर ठाकरे यांनी दिली.

फळगळतीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान

आंबीया बहारासाठी संत्रा झाडाला ताण द्यावा लागतो. त्यानंतर तीन महिने नंतर फुलाेरा येतो. नेमका या वळेस अवकाळी पाऊस झाल्याने फुलोरा येणार नाही. तर अनेक ठिकाणी फळगळती झाल्याची माहिती महाऑरेंजचे कार्यकारी संचालक श्रीधर ठाकरे यांनी दिली. विदर्भात 1 लाख 55 हजार हेक्टरवर संत्र्याची लागवड होते. त्यापैकी 1 लाख 10 हजार हेक्टरवर संत्र्याचे उत्पादन होते. प्रति हेक्टरी सात ते आठ टन उत्पन्न होते. 1 लाख हेक्टरमध्ये सात ते आठ लाख टन संत्रा उत्पन्न मिळते. यामध्ये 60 टक्के आंबीया बहार व 40 टक्के मृग बहार होतो.

50 टक्के संत्रा गळाला

आंबीया बहार सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीत होतो. आंबीया बहाराचे 5 लाख टन उत्पन होते. तापमानामुळे यापैकी अडीच लाख टन म्हणजे 50 टक्के संत्रा गळाला. तर मृग बहार फेब्रुवारी ते एप्रिल या काळात निघतो. त्यापासून तीन लाख टन उत्पादन येते. पण, मृग बहाराचे नुकसान झालेले नाही. मृग बहार जून व जुलैमध्ये येईल. असे महाऑरेंजचे कार्यकारी संचालक श्रीधर ठाकरे सांगितले आहे.

बातम्या आणखी आहेत...