आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंत्यसंस्कारावेळी भाजलेल्या तिघांपैकी दोघांचा मृत्यू:नागपूर येथे प्रेताला अग्निडाग देताना उडाला होता भडका

नागपूर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंत्यसंस्कारादरम्यान अग्नीडाग देताना भडका उडून गंभीर भाजलेल्या दोघांचा अखेर मृत्यू झाला. नवीन कामठी पोलिस स्टेशन हद्दीत गुरूवारी (ता. 28) रोजी राणी तलाव मोक्षधाम येथे सकाळी घडलेल्या या घटनेत अंत्ययात्रेत सहभागी तिघे भाजले होते.

सुधीर महादेव डोंगरे (45, नागसेन नगर कामठी) व दिलीप घनश्याम गजभिये (60 रा. न्यू खलाशी लाईन कामठी) ही मृतांची नावे आहे. या दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना नागपूरला हलविण्यात आले होते.

प्राप्त माहितीनुसार स्थानिक मोदी पडाव नागसेन नगर येथील रहिवासी सिद्धार्थ अंतुजी हुमने यांचा अपघाती मृत्यू झाल्याने गुरुवारी दुपारी कामठीच्या राणी तलाव मोक्षधाम त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी प्रेताला अग्नी देत असताना टेंभा लावून डिझेलचा भडका उडाल्याने कार्यक्रमात सहभागी झालेले सुधीर डोंगरे (45), सुधाकर बुधाजी खोब्रागडे (60, दोघेही राहणार नागसेन नगर कामठी) व दिलीप घनश्याम गजभिये (60 रा. न्यू खलाशी लाईन कामठी) तिघे जण भाजल्याने गंभीर जखमी झाले. त्यावेळी उपस्थितांची एकच धावपळ उडाली.

नागरिकांनी लगेच त्यांना उपचारार्थ कामठीच्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयात हलविले असता यातील सुधीर डोंगरे व दिलीप गजभिये यांची परिस्थिती नाजूक असल्याने यांना नागपूरच्या मेयो रुग्णालयात हलविण्यात आले तर अन्य जखमी सुधाकर खोब्रागडे यांच्यावर कामठीच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

बातम्या आणखी आहेत...