आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१८ मध्ये स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात गगनयान मिशनची घोषणा केली होती. २०२२ मध्ये ते साध्य करण्याचे तात्पुरते लक्ष्य होते. मात्र, कोरोना महामारीमुळे विलंब झाला. आता पहिल्या मानवरहित अंतराळयानाचे प्रक्षेपण २०२३ च्या शेवटी होईल, अशी माहिती इस्राेचे अध्यक्ष डाॅ. एस. सोमनाथ यांनी पत्रपरिषदेत दिली.
नागपूर येथे आयोजित भारतीय विज्ञान काँग्रेसला डॉ. सोमनाथ यांची प्रमुख उपस्थिती आहे. ते म्हणाले, फेब्रुवारी २०२२ मध्ये अंतराळ धोरणाच्या पहिल्या मसुद्यावर चर्चा झाल्यानंतर, अंतराळ विभागाने त्यावर काम केले. आता हा मसुदा पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवला आहे. हे धोरण लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळाकडे जाण्यापूर्वी पीएमओ संबंधित विभाग आणि मंत्रालयाशी सल्लामसलत करील असे सोमनाथ यांनी सांगितले. चंद्रयान ३ मोहिमेची तयारी पूर्ण झाली असून सेफ लँडिंगवर आमचा भर राहाणार आहे, असे सोमनाथ यांनी सांगितले. चांद्रयान-३ ही भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची महत्त्वाकांक्षी योजना आहे. चांद्रयान १ आणि २ नंतर इस्रो लवकरच चांद्रयान-३ लाँच करणार आहे. चांद्रयान-३ चे काम वेगाने सुरू आहे. भूतकाळातील उणिवांपासून धडा घेत भारताचे शास्त्रज्ञ चांद्रयान-३ मोहिमेत परिश्रमपूर्वक काम करत आहेत. चांद्रयान-२ चा ऑर्बिटर चांद्रयान-३ मिशनमध्ये वापरला जाईल. ते खूप फायदेशीर ठरेल. चांद्रयान-३ अगदी चांद्रयान-२ सारखंच असणार आहे. परंतु, यावेळी फक्त लँडर-रोवर आणि प्रॉपल्शन मॉडेल असेल.
अंतराळ कचऱ्याचे व्यवस्थापन अंतराळ कचरा ही मोठी समस्या आहे. त्याचे व्यवस्थापन आणि उपायासाठी वेगवेगळे उपाय सुचवले जात आहेत. अमेरिकेच्या नासा या अवकाश संशोधन संस्थेने दिलेल्या माहितीनुसार अवकाश कचऱ्याचे वीस हजार तुकडे असून त्यात अग्निबाणांचे सुटे भाग, निकामी उपग्रह व इतर वस्तूंचा समावेश आहे. कचऱ्याच्या रूपातील कोट्यवधी निरुपयोगी वस्तू अवकाशात फिरत आहेत. सोडल्या जाणाऱ्या नव्या उपग्रहांना यातले काही निरुपयोगी उपग्रह अथवा कचऱ्यामधील काही घटक धडकण्याची शक्यता असते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.