आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

नागपूर:कोरोनाची घातकता खूपच कमी; मृत्यू दराबाबत भीती अनाठायी : डॉ. इंद्रजित खांडेकर

नागपूर I अतुल पेठकर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ... ते सर्व नकळत बरे झाले, त्यामुळे संशोधन गरजेचे

राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र व दिल्ली सरकार यांच्या सयुंक्त सहकार्याने नुकत्याच केलेल्या प्राथमिक अँटिबॉडी सिरो सर्व्हेनुसार दिल्लीच्या जवळपास २३% टक्के लोकांमध्ये कोरोनाच्या अँटिबॉडीज आढळल्या. यावरून कोरोनाची घातकता खूपच कमी असून मृत्युदराबाबतची भीती अनाठायी व अवास्तव असल्याची दिलासादायक माहिती न्यायवैद्यकशास्त्र तज्ज्ञ डॉ. इंद्रजित खांडेकर यांनी दिली.

दिल्लीची लोकसंख्या अंदाजे ३ कोटी आहे. त्यापैकी २३% म्हणजे जवळपास ७० लाख लोक कोरोनाने बाधित झाले. यातील बहुतांश लोक कुणाच्याही नकळत व रुग्णालयात न जाता बरे झाले. यापैकी ३७०० लोकांचा मृत्यू झाला. म्हणजे वास्तविक मृत्युदर हा फक्त ०.०५ % निघतो.

स्वाइन फ्लूचा दाखला : २००९ मधील स्वाइन फ्लूच्या साथीच्या वेळीसुद्धा असेच झाले होते. सुरुवातीला मृत्युदर ३.४ सांगितला होता. डब्लूएचओने २००९ मध्येसुद्धा कोरोनासारखेच विलगीकरण, फिजिकल डिस्टन्सिंग, मास्क, वारंवार हाथ धुणे, पीपीई किट वापरणे इत्यादी निर्देश दिले होते. त्यामुळे अमेरिकेत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परिणामी शाळांसह इतर गोष्टी काही प्रमाणात बंद करण्यात आल्या होत्या. त्या वेळी सोशल मीडियाचा इतका प्रभाव नसल्यामुळे याचा परिणाम भारतीयांवर झाला नव्हता. २००९ च्या साथीच्या पहिल्या लाटेत जगात जवळपास ५.५ लाख लोकांचा मृत्यू स्वाइन फ्लूने झाल्याचा निष्कर्ष डब्लूएचओने काढला होता हे विशेष.

... ते सर्व नकळत बरे झाले, त्यामुळे संशोधन गरजेचे
अँटिबॉडी सिरो सर्व्हेनुसार मृत्युदराबाबत कोरोनाची भीती अनाठायी व अवास्तव आहे हे लक्षात येते. अनेक लोक लागण होऊन नकळत बरे पण झाले हे टेस्टमधून कळते. तसेच कोरोनाचे देशातील मृत्यू अतिरिक्त आहेत की आपण मागील वर्षापर्यंत दिलेल्या मृत्यूंच्या कारणांना या वेळी फक्त आधीचे नाव बदलून कोरोना मृत्यू म्हणतोय, यावर खरेच संशोधन होणे गरजेचे आहे,असे डाॅ.खांडेकर यांनी सांगितले.