आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहित्यिक, वाचकांशी संवाद:संतवाङ्मयातून आलेल्या साहित्याचा भावार्थ कधीही बदलत नाही : गडकरी

महात्मा गांधी साहित्य संमेलन नगरी, वर्धा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे सूप वाजले

जे साहित्य संत वाङ्मयातून मिळालेले आहे त्याचा भावार्थ कधीही बदलू शकत नाही. समाजसुधारणेचा विचार त्यातूून आला आहे. आचरण, वर्तन आणि व्यवहार तसा असायला हवा. त्यात जातीयवाद, सांप्रदायिकता, असहिष्णुता येता कामा नये. सगळ्यांचाच विचार मांडण्याचा अधिकार राजकारण्यांनीही मान्य केलाच पाहिजे, असा संवाद केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी साधला.

वर्धा येथे ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समाराेपाप्रसंगी ते बाेलत हाेते. ते म्हणाले की, साहित्य संस्कृतीतून समाज बदलत असताे. त्याचा समाजावर दीर्घकालीन परिणाम हाेत असताे. गांधीजी, विनाेबा भावेंच्या व्रतस्थ जीवनातून, त्यांच्या लेखनातून एक संस्कार मिळाला. भविष्य घडवायचे असेल तर त्याची गरज आेळखून त्या अनुशंगाने साहित्यिकांनीही विचार मांडायला हवे.

पिढीनुसार बदल व्हावे आत्मनिर्भर भारत बनवायचा असेल तर आजची पिढी काय वाचते ते बघणे महत्त्वाचे ठरेल. प्रत्येकाकडूनच काहीतरी शिकण्यासारखे असल्याने जनरेशन गॅपचा विचार करावा. जुन्या पिढीला जे वाटते ते नव्या पिढीला वाटेल, असे नाही. त्यामुळे जनरेशन गॅप लक्षात घेऊन डिजिटलद्वारे साहित्य कसे पाेहाेचेल याचा विचार केला पाहिजे, असे गडकरी म्हणाले.

यापुढचे शिक्षण ज्ञानभाषा मराठीतून होईल : उपमुख्यमंत्री फडणवीस अतुल पेठकर | (राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्यनगरी), वर्धा नव्या पिढीचा भाषेकडचा कल कमी होण्यामागे आपण मराठीला ज्ञानभाषा करू शकलो हे आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने आखलेल्या नव्या शैक्षणिक धोरणांत प्रादेशिक भाषेतून शिक्षण देण्यावर भर देण्यात आला आहे. यामुळे या पुढील सर्व शिक्षण मराठीतून देण्यात येईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केला. वर्धा येथे आयोजित संमेलनात आयोजित “गांधीजी ते विनोबा’ या परिसंवादादरम्यान उपमुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली त्या वेळी ते बोलत होते.

साहित्यात आमचेही योगदान साहित्यनिर्मितीत राजकारण्यांचेही मोठे योगदान आहे. राजकारणी साहित्यनिर्मितीची प्रेरणा आहेत. आम्ही नसतो तर अनेकांना व्यंगचित्र काेणाचे काढावे असा प्रश्न पडला असता. आमच्यातही यमक जुळवणारे, स्क्रिप्ट लिहिणारे आणि शीघ्रकवी आहेत. सकाळी तुम्ही टीव्ही लावलात की आमची प्रतिभा ओसंडून वाहते, असे फडणवीसांनी सांगताच सभागृहात खसखस पिकली.

बातम्या आणखी आहेत...