आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतीय जनता पक्षाचा विश्वासघात करून मिळवलेली सत्ता हातातून निसटल्याची आणि मंत्रिपदे हातातून गेल्याची मळमळ उद्धव ठाकरे, अजित पवार, बाळासाहेब थोरात, धनंजय मुंडे या नेत्यांच्या छत्रपती संभाजीनगर येथील सभेत बाहेर पडली, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना केली. केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार या डबल इंजिन सरकारमुळे महाराष्ट्राच्या विकासकामांना गती मिळाल्याचे पाहून बावचळलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजप नेत्यांच्या नावाने शिव्याशाप देऊन आपली निराशा व्यक्त केली, असेही त्यांनी सांगितले.
सत्तेवर आल्या आल्या उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्याशी बेइमानी केली. देवेंद्र फडणवीस सरकार सत्तेत असताना मराठवाड्यातील पाणीप्रश्न सोडवण्यासाठी वॉटरग्रीडची योजना तयार करण्यात आली होती. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री झाल्यावर ही मराठवाड्याच्या विकासाला वेगळे वळण देणारी वॉटरग्रीड योजना रद्द केली. विदर्भ-मराठवाड्याच्या विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या वैधानिक विकास महामंडळांची मुदत संपल्यावर या महामंडळांना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मुदतवाढ दिली गेली नाही. राज्यपाल नियुक्त १२ आमदारांचा विषय संपवा मग वैधानिक विकास महामंडळांना मुदतवाढ देऊ, अशी भाषा अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री असताना वापरली होती. आता हीच मंडळी मराठवाड्याच्या विकासाच्या नावाने गळा काढत आहेत, अशी टीका बावनकुळे यांनी केली.
सभेत केवळ अाक्राेश हाेता
महाविकास आघाडीच्या छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या सभेमध्ये केवळ आक्रोश होता, ही शिल्लक सेनेची बोंबाबोंब सभा होती. भाषणातून सर्व वक्त्यांनी खोटारडेपणाचा कळस गाठला, अशी टीकाही बावनकुळे यांनी केली. नामकरण करण्याचा अधिकार केंद्र सरकारला होता. याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठवला. मोदींच्या सरकारने मान्य केला.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.