आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएप्रिल, मे महिन्यात जिल्ह्यात आयोजित शासकीय योजनांच्या जत्रेतून गरजू लाभार्थींना शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी यंत्रणांनी सुक्ष्म नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिले. बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात अायाेजित आढावा सभेत जिल्हाधिकारी षण्मुगराजन बोलत होते. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, सहायक जिल्हाधिकारी श्रीमती मिन्नु पी. एम., निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिता आंबरे, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. विजय काळबांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुहास कोरे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. पुढे बाेलताना ते म्हणाले की, शासकिय योजनांचा लाभ जिल्ह्यातील शेवटच्या घटकापर्यंत संबंधित यंत्रणांनी पोहोचवावा.
संबंधित लाभार्थींना योजनांचा लाभ देण्यासाठी कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे, त्याची पूर्तता लाभार्थींकडून करुन घ्यावी. लाभार्थींकडून योजनेचा लाभ मिळण्यासाठी अर्ज सादर करुन घ्यावेत. कोणत्याही गरजू लाभार्थींचा अर्ज नामंजूर केला जाणार नाही याची जबाबदारी संबंधित विभागाची आहे. प्रत्येक यंत्रणेचा या जत्रेमध्ये सहभाग राहणार आहे. यंत्रणेने या जत्रेच्या दृष्टीने काम करीत असलेल्या कामांचा अहवाल जिल्हा जनकल्याण कक्षाला दररोज सादर करावा. लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत देण्यात येणाऱ्या सेवांची विविध यंत्रणांनी प्रभावी अंमलबजावणी करावी.
तसेच आपले सरकार सेवा केंद्रामार्फत देण्यात येणाऱ्या ऑनलाईन सेवा हया लाभार्थींना वेळेत उपलब्ध होतील यादृष्टीने नियोजन करावे, असे निर्देश त्यांनी दिले. प्रत्येक गावातून १०० पेक्षा जास्त, तालुक्यातून १५ हजार, तर जिल्ह्यातून ७५ हजार लाभार्थींना एकाच दिवशी योजनांचा लाभ देण्याचे नियोजन करावे असे त्यांनी सूचित केले. यावेळी श्री. हिंगे यांनी शासकीय योजनांची जत्रा या उपक्रमाची माहिती दिली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.