आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप Vs 'मविआ':यापुढची वज्रमुठ सभा मंगलकार्यालयात घ्यावी लागेल, चंद्रशेखर बावनकुळेंची सडकून टीका

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

''आता उन्हाचे आणि पावसाचे कारण देत सभा रद्द झाल्याचे सांगत आहे. यापूर्वीच्या चार सभा झाल्या तेव्हा ऊन नव्हते काय? यापूर्वीच्या सभाही भर उन्हातच झाल्या. मात्र सभेला लोकच येत नसल्याने यापुढची सभा मंगलकार्यालयातच घ्यावी लागेल अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर येथे आज माध्यमांशी बोलताना केली.

कानडी जनता माफ करणार नाही

बजरंगबली, स्वातंत्र्यवीर सावरकर, प्रभू राम, शिवाजी महाराज असे महापुरूष आणि देवतांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसला कर्नाटकची जनता आता आणि २०२४ मध्येही माफ करणार नाही. २०२४ मध्ये काँग्रेसला ४४० होल्टचा करंट लाग्णार आहे.

राष्ट्रवादीचे कुणीही संपर्कात नाही

राष्ट्रवादीचा कोणताही नेता आमच्या संपर्कात नाही. पण कोणी संपर्क साधला तर झेंडा आणि दुपट्टा तयार आहे. माझा सल्ला शरद पवारांच्या पचनी पडलेला नाही असे उद्धव ठाकरे म्हणाले. पण, खरे सांगायचे तर उद्धव ठाकरेच कोणाला पचनी पडलेले नाही. स्वत:चा पक्ष सांभाळता न येणारा नेता दुसऱ्याचे नेतृत्व करू शकत नाही. ठाकरे आमच्यासोबत होते तेव्हा मोदींवर किती स्तुतीसुमने उधळली याच्या चित्रफिती आमच्या जवळ आहे. महाविकास आघाडीत गेल्यामुळे माेदी विरोध आवश्यक आहे.

सभेबाबत काय म्हणाले पटोले?

नाना पटोले यांनी वज्रमुठ सभा पावसामुळे होणार नसल्याचे सांगितले आहे. पावसाने वाताहत झाली आहे आणि नैसर्गिक वातावरण असल्याने सभेपूर्वी तीनही पक्षाची बैठक होईल. या बैठकीत सभेबाबत निर्णय होईल. सभा घ्यायचे ठरले तर तातडीने सभा होईल. सामन्यात जे छापून आले त्यावर प्रतिक्रिया देण्याची गरज नाही.