आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नागपूर:रेमडेसिविर इंजेक्शनच्या किमती दीड हजार रुपयांपर्यंत आणणार

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील रुग्णालयांकडून छापील किमतीपेक्षा जास्त दराने रेमडेसिविर इंजेक्शनची विक्री होत आहे. यामुळे विक्री किमतीच्या कमाल ३०% जास्त आकारून राज्यात रेमडेसिविरची एमआरपी निश्चित करण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासनाने रेमडेसिविर उत्पादक कंपन्यांना दिले आहेत. रेमडेसिविरच्या िकमती १५०० रुपयांपर्यंत कमी करण्याचे अन्न व आैषधी प्रशासनाचे प्रयत्न आहेत.

फेब्रुवारीपासून रुग्णालये व पुरवठादार घाऊक विक्रेत्यांनी विक्री किंमत कमी केली. परंतु त्याचा लाभ रुग्णांना न देता विक्रेते छापील किमतीनुसार विक्री करत आहेत. पडताळणीत उत्पादकांनी रुग्णालये तसेच घाऊक विक्रेत्यांना रेमडेसिविरची विक्री ८०० ते १३०० रुपयांपर्यंत केल्याचे आढळून आले. तथापि, काही रुग्णालये खरेदी किमतीवर १० ते ३०% अधिक रक्कम आकारून रुग्णांना इंजेक्शन देत आहेत.

बातम्या आणखी आहेत...