आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

दिव्य मराठी विशेष:नवेगाव बांध येथील भोजनालये खवय्यांना लावताहेत रानभाज्यांची गोडी; सहा मित्र रोज जंगलातून आणतात वेगवेगळ्या रानभाज्या

नागपूर / अतुल पेठकर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चवदार रानभाज्या वाढताना भाजीची आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्तताही सांगतात
Advertisement
Advertisement

राज्यातील सेलिब्रिटी शेफ विष्णू मनोहर पावसाळी रानभाज्या वर्षभर उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न करत आहेत. त्यांच्या कुकरी शोमधून ते रानभाज्या कशा करायच्या हे सांगतात. पण त्यांच्याही पूर्वीपासून गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगाव बांध येथील सावजी चचाने भोजनालयाने आपल्या ग्राहकांना रानभाज्यांची गोडी लावली आहे.

माधवराव चचाने यांचे हे भोजनालय आहे. ते व त्यांचे सहा मित्र रोज नजीकच्या जंगलात जाऊन ताज्या रानभाज्या निवडून आणतात. त्या चिरून आणि स्वच्छ करून त्याची भाजी ग्राहकांना वाढतात. एवढेच नव्हे तर प्रत्येक भाजी व त्या भाजीची उपयुक्तता सांगतात. “आम्ही एकदा खाऊन पाहण्यास सांगताे. पण एकदा खाल्ल्यावर खवय्यांना तिची सवय लागते असा अनुभव आहे,’ असे चचाने यांनी “िदव्य मराठी’शी बोलताना सांगितले. पूर्वीच्या लोकांना रानभाज्या व त्यांचे आहार तसेच औषधी महत्त्व माहिती होते. त्यामुळे रोजच्या आहारात त्याचा समावेश होता. पिढी दर पिढी याविषयीची माहिती कमी होत गेली. आम्ही मात्र जुन्याजाणत्यांकडून माहिती करून घेतली, असे चचाने म्हणाले.

उंदीर कान भाजी, भजे, पिंपरबारची उसळ अन् जोंधुरलीचा मुरब्बा

चचाने त्यांच्या भोजनालयात भुई आवळा, जंगली बोर, उंदीर कान भाजी व भजे, कुळ्याच्या फुलाची व शेंगांची भाजी, जोंधुरली फुळांचा मुरब्बा व भाजी, सेर डिरेची तसेच हरफतरीची भाजी आणि पिंपरबारची उसळ करतात.

विष्णू मनाेहरांचे प्रयत्न

फक्त पावसाळ्यातच आपोआप येणाऱ्या रानभाज्या शेती करत वर्षभर उपलब्ध करून देण्याचे सेलिब्रिटी शेफ विष्णू मनोहर यांचे प्रयत्न असून गेल्या चार -पाच वर्षांपासून त्यांच्या कुकरी शोच्या माध्यमातून रानभाज्यांचे महत्त्व, त्याचा प्रचार-प्रसार करीत आहेत. कोळी, गोंड, गोवारी, ढिवर या पूर्व विदर्भातील मुख्य आदिवासी जमाती दैनंदिन खाद्यान्नात सुमारे २५ रानभाज्यांचा उपयोग करत असल्याचे समोर आले आहे.

Advertisement
0